अरे देवा! सून म्हणून हे कुणाला आणलं, नवरीबाईचं खरं रूप समोर, सासर हादरलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding Story : लग्नानंतर 2 आठवडे सर्व काही व्यवस्थित चाललं. सून सुसंस्कृत होती याचा कुटुंबाला आनंद होता. पण अखेर सुनेचा खरा चेहरा समोर आला. सुनेचं असं सत्य कुटुंबाला समजलं की सगळ्यांना धक्का बसला.
अजमेर : नवंनवं लग्न ज्याचा उत्साह फक्त नवदाम्पत्यच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातही असतो. विशेषत: वराकडील कुटुंब ज्यांच्या घरी एक नवीन सदस्य, लक्ष्मीच्या पावलांनी सून येणार असते. जशी नववधूला सासरची मंडळी कशी असतील याची धाकधूक असते, तशीच सासरच्यांनाही आपली सून कशी असेल याची उत्सुकता असते. अशीच एक नवीन सून जिचं सत्य काही दिवसांनी समोर आलं आणि संपूर्ण सासर हादरलं.
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात राहणाऱ्या विष्णू कुमारचं लग्न 20 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील खंडवा इथं राहणाऱ्या अनुराधाशी झाला. पप्पू मीणा यांनी विष्णू आणि अनुराधा यांच्या भेट घडवून आणली होती. पप्पूने अनुराधाशिवाय इतर अनेक मुलींचे फोटो विष्णूला दाखवले होते, पण त्याला अनुराधा आवडली. अनुराधाने सांगितलं होतं की तिचे वडील वारले आहेत. मोठी बहीण विवाहित आहे आणि धाकटा भाऊ अविवाहित आहे.
advertisement
पप्पूने सांगितले की त्याला काही पैसे द्यावे लागतील. विष्णूने पप्पू मीणाला 2 लाख रुपये दिले आणि मग लग्न झाले. हे लग्न एका मंदिरात झालं आणि नंतर त्याची नोंदणी करण्यात आली. लग्नानंतर 2 आठवडे सर्व काही व्यवस्थित चाललं. सून सुसंस्कृत होती याचा कुटुंबाला आनंद होता. पण 3 मेच्या रात्री सुनेचा खरा चेहरा समोर आला. सुनेचं असं सत्य कुटुंबाला समजलं की सगळ्यांना धक्का बसला.
advertisement
तिने सर्वांसाठी जेवण बनवलं आणि त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. संपूर्ण कुटुंब झोपलेलं होतं. सकाळी उठले तेव्हा सुमारे 1,50,000 रुपये किमतीचे दागिने, 30000 रुपये रोख आणि एक महागडा मोबाईल फोन चोरीला गेल्याचं समजलं.
विष्णूने पोलिसांना सांगितलं की, पप्पूने सांगितलं होतं की फसवणूक होणार नाही, पण अनुराधाने फसवणूक केली. त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्राकडून फोन विकत घेतला होता. पप्पूला दिलेले दोन लाख रुपयेही कोणाकडून तरी कर्ज घेऊन दिले होते. पण आता सगळं उद्ध्वस्त झालं आहे.
advertisement
गरीब कुटुंबातील विष्णूने लग्न करण्यासाठी कर्ज घेतलं पण त्याला कल्पनाही नव्हती की वधू अवघ्या चौदा दिवसांत पळून जाईल. वधू आणि दलालाची माहिती देऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू सतत मॅनटाउन पोलीस स्टेशनमध्ये जात आहे. त्याला फक्त एकच प्रश्न आहे, वधू सापडली का?. दरम्यान पोलिसांनी आपण शोध घेत आहोत, अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही, असं सांगितलं.
Location :
Delhi
First Published :
May 11, 2025 11:37 AM IST