हनीमूनची घाई! लग्नाआधीच बुक केलं 11 लाखांचं तिकीट, आता म्हणे, वाटतेय भीती, पण कशाची?

Last Updated:

Honeymoon story : हनीमूनसाठी कपलने टान्झानिया आणि झांझिबारला एक ट्रिप प्लॅन केली आहे, ज्याच्या तिकिटाची किंमत 13 हजार डॉलर्स म्हणजे तब्बल 11 लाख रुपये आहे. पण आता महिलेला हनिमूनला जाण्याची भीती वाटतेय.

News18
News18
नवी दिल्ली : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीसोबत एखाद्या सुंदर ठिकाणी हनीमूनला जायचं असतं. लोक त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग करतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते परदेशात प्रवास करतात. एका महिलेने तिच्या होणार्‍या पतीसोबत हनीमून ट्रिपचा प्लॅन केला. यासाठी त्यांनी 11 लाख रुपये किमतीचं तिकीट काढलं. पण आता तिला हनीमूनला जायची भीती वाटते आहे.
यूकेच्या केंट इथं राहणारी 27 वर्षीय बेथानी रोड्स शाळेत शिक्षिका आहे. 29 वर्षीय कॉनर बर्न्ससोबत ती 9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. आता दोघंही या वर्षी ऑगस्टमध्ये लग्न करणार आहेत. त्यांच्या उत्साहाला पारावर नाही. लग्नाआधी त्यांनी हनीमूनची प्लॅनिंग केली आहे.
हनीमूनसाठी त्यांनी टान्झानिया आणि झांझिबारला एक ट्रिप प्लॅन केली आहे, ज्याच्या तिकिटाची किंमत 13 हजार डॉलर्स म्हणजे तब्बल 11 लाख रुपये आहे. पण आता बेथानीला तिच्या हनिमूनला जाण्याची भीती वाटतेय. याचं कारण आहे तिला असलेली अ‍ॅलर्जी. जी इतकी धोकादायक आहे की ती त्याचा जीवही घेऊ शकते.
advertisement
न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, केनेडी न्यूज अँड मीडियाशी बोलताना, बेथानीने खुलासा केला की ती कतार एअरवेजने प्रवास करणार आहे, जिथे ड्रायफ्रुट्स मिळतील. तिला याची अ‍ॅलर्जी आहे. आता तुम्ही म्हणाल की तिने मग ते खाऊ नये. पण तिला फक्त खाल्ल्याने नाही तर हवेतून पसरणारी ऍलर्जी आहे. याचा अर्थ असा की जर ड्रायफ्रुट्समधील घटक हवेत उडले किंवा त्यांना त्याचा वास आला तर तिची ऍलर्जी सक्रिय होते आणि तिला अॅनाफिलेक्टिक शॉक येऊ शकतो, ज्यामुळे तिचा श्वास थांबू शकतो किंवा तिच्या हृदयाचे ठोके थांबू शकतात.
advertisement
तिला वयाच्या चौथ्या वर्षापासून ही ऍलर्जी आहे. जेव्हा ती तिच्या हनिमूनची योजना आखत होती, तेव्हा तिला वाटलं नव्हतं की ही ऍलर्जी तिच्यासाठी अडथळा ठरेल. पण जेव्हा त्याला कळलं की विमान कंपनी विमानात ड्रायफ्रुट्स देणार आहेत, तेव्हा ती घाबरली.
advertisement
आपला प्रवास सोपा आणि आनंददायी करण्यासाठी, तिने कतार एअरवेजशी संपर्क साधला आणि त्यांना त्याच्या अ‍ॅलर्जीबद्दल माहिती दिली. तिने विमान कंपनीला प्रवाशांना याबाबत सर्वांना माहिती देण्याची विनंती केली. याआधीही तिने काही विमानातून प्रवास केला तेव्ह अशी घोषणा केली आहे. पण कतार कंपनीने स्पष्ट केलं की ते असं काहीही करू शकत नाहीत. तिनं विचारलं की ती स्वतः हे सांगू शकते का? ज्यावर कंपनीनं तिला सांगितलं की जर तिने तसं केलं तर तिला विमानातून खाली उतरवलं जाईल.
advertisement
विमान कंपनीने तिला आगाऊ तयारी करून येण्याचा सल्ला दिला. आजूबाजूला प्रवाशांशी बोला, खिडकीजवळची सीट घ्या किंवा कोणाशी तरी ती बदला. आपत्कालीन परिस्थितीत ऍलर्जी टाळण्यासाठी वापरला जाणारा एपिपेन सोबत आणा, हँड सॅनिटायझर, फेस वाइप्स वापरा आणि तुमची उर्वरित औषधं सोबत आणा.
आता ती हनीमून ट्रिप रद्द करण्याचा विचार करत आहे कारण तिला कोणत्याही अडचणीत अडकायचं नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
हनीमूनची घाई! लग्नाआधीच बुक केलं 11 लाखांचं तिकीट, आता म्हणे, वाटतेय भीती, पण कशाची?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement