एएआयबी अहवालानुसार, एअर इंडिया विमान AI-171 च्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा करणारे स्विच बंद करण्यात आले होते. यामुळे वैमानिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काही सेकंदांनंतर, विमान आकाशातून पडले आणि अहमदाबादमध्ये कोसळलं.
प्लेनच्या टॉयलेटमध्ये टिश्यू! सुरक्षा एजन्सी घाबरल्या, दिवसरात्र तपास, पण प्रकरण काय?
एअर इंडिया विमान AI171 च्या अपघाताच्या तपासात एक नवीन फोटो समोर आला आहे. यात थ्रस्ट लीव्हर क्वाड्रंट आणि फ्युल कंट्रोल दिसत आहेत. थ्रस्ट लीव्हर क्वाड्रंट आणि फ्युल कंट्रोल स्विचची स्थिती या अपघाताची भीषणता दर्शवतं. हा फोटो एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक अहवालाचा भाग आहे. हा अपघात समजून घेण्यासाठी ते महत्त्वाचम ठरत आहे.
advertisement
थ्रस्ट लीव्हर्स हे विमानाच्या कॉकपिटमध्ये बसवलेले असतात. हे पायलट इंजिनला दिलेल्या इंधनाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी वापरतात. हे इंजिनचे थ्रस्ट आउटपुट निश्चित करतं.
फोटो काय दर्शवतो?
फोटो दोन भागात आहे. डावीकडील फोटोत विमानाच्या कॉकपिटमध्ये थ्रस्ट लीव्हर्स आणि फ्युल कंट्रोल दिसत आहे. विमान अपघातात थ्रस्ट लीव्हर्स पूर्णपणे नष्ट झाले आहेत. हे गंभीर नुकसान दर्शवतं. रिपोर्टमध्येही कटऑफ स्विच बंद झालं त्यामुळे इंधन पुरवठा थांबला होता, याकडे इशारा करण्यात आला आहे. तर उजवीकडील फोटो एखाद्या योग्य असं कंट्रोल पॅनलचं आहे. त्यात थ्रस्ट लीव्हर्स आणि इंधन कट ऑफ स्विचेस आहेत. ते इंजिन पॉवर आणि इंधन पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वापरलं जातं. हे योग्य विमानाचं कंट्रोल पॅनेल आहे.
AAIB च्या अहवालानुसार, 12 जून रोजी अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान का कोसळलं हे समजून घेण्यासाठी थ्रस्ट लीव्हर्सची स्थिती आणि इंधन नियंत्रण स्विचची स्थिती महत्त्वाची असू शकते. या फोटोवरून एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं हे समजू शकतं. कारण अहवालात असंही सूचित केलं आहे की कटऑफ स्विच बंद होता. त्यामुळे इंधन पुरवठा बंद झाला होता.
एएआयबीच्या अहवालात काय उघड झालं?
AAIB च्या अहवालानुसार, इंजिन 1 आणि इंजिन 2 चे इंधन स्विच काही सेकंदात 'रन' स्थितीत आलं. दोन्ही इंजिनचे EGT वाढलं, जे सूचित करतं की रिलाईट प्रक्रिया सुरू झाली. म्हणजेच, इंजिन पुन्हा सुरू झालं. इंजिन 1 यशस्वी झाले, परंतु दुसरं इंजिन सुरू होऊ शकलं नाही. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असं दिसून येतं की वैमानिकांमध्ये गोंधळ होता. एका वैमानिकाने विचारलं, 'तुम्ही का कट ऑफ केला?' यावर दुसऱ्या वैमानिकाने उत्तर दिलं, 'मी ते केले नाही.' हे कदाचित गैरसमज दर्शवतं.
अहवालातील इनपुट यंत्रसामग्री बिघाड किंवा पायलटच्या चुकीकडे निर्देश करतात. दोन्ही पायलटपैकी कोणीही कटऑफ स्विचमध्ये छेडछाड केली का? हा अजूनही तपासाचा विषय आहे. तथापि, AAIB ने कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून काही माहिती काढली आहे.