TRENDING:

एअरपोर्ट लाउंजवर फ्री खाऊन-पिऊन निघतात प्रवासी, मग त्याचे पैसे कोण देतं?

Last Updated:

एअरपोर्टवरील फ्री लाउंज प्रवेश मागचं सत्य तुम्हाला माहितीय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अनेक प्रवासी विमानप्रवासाच्या आधी थोडा आराम, चहा–कॉफी किंवा खाण्याचा आनंद घेण्यासाठी एअरपोर्ट लाउंजचा वापर करतात. आजकाल बहुतेक लोक हे लाउंज मोफत वापरतात आणि त्यांना वाटतं की ही सेवा पूर्णपणे फ्री आहे. पण खरोखरच हे सगळं फुकट मिळतं का? आणि जर आपण पैसे देत नाही, तर मग लाउंज ऑपरेटरला कसा फायदा मिळतो? खरंतर यामागचं गणित थोडं वेगळंच आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पुण्यातील ‘व्ही स्क्वेअर सिस्टम्स’मध्ये काम करणारे डेटा ऍनालिस्ट सूरज कुमार तलरेजा, जे पूर्वी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत कार्यरत होते, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्यांच्या मते, लाउंज ऑपरेटरांना तेव्हा देखील चांगला नफा मिळतो, जेव्हा तुम्ही एक रुपयाही खर्च करत नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं शक्य आहे? चला सोप्या शब्दात समजून घेऊ.

advertisement

एअरपोर्ट लाउंज म्हणजे काय?

एअरपोर्ट लाउंज ही विमानतळावरील एक खास जागा असते, जिथे प्रवासी आपल्या फ्लाइटच्या आधी आराम करू शकतात, काम उरकू शकतात, खाणं–पिणं करू शकतात किंवा थोडा वेळ झोपही घेऊ शकतात. येथे बुफे जेवण, पेय, वाय-फाय, मोबाईल चार्जिंग पॉइंट, वृत्तपत्रं आणि आरामदायक आसनव्यवस्था असते. काही प्रीमियम लाउंजमध्ये शॉवर, स्पा आणि झोपण्याची सुविधाही दिली जाते.

advertisement

मोफत सेवा खरंच मोफत आहे का?

तलरेजा सांगतात की बहुतेक भारतीय प्रवासी लाउंजमध्ये प्रत्यक्ष पैसे न देता प्रवेश करतात. तुम्ही फक्त तुमचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाइप करता आणि आत जाता. तुम्हाला ते मोफत वाटतं, पण त्यासाठी प्रत्यक्षात पैसे कोण देतं? याचं उत्तर म्हणजे तुमचं बँक किंवा कार्ड नेटवर्क जसं की व्हिसा, मास्टरकार्ड किंवा अमेरिकन एक्सप्रेस.

advertisement

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या कार्डद्वारे (एचडीएफसी, अॅक्सिस, एसबीआय, आयसीआयसीआय किंवा रूपे कार्ड) लाउंजमध्ये जाता, तेव्हा त्या लाउंज ऑपरेटरला तुमच्या बँकेतून ठराविक रक्कम मिळते. ही सुविधा बँकेच्या रिवॉर्ड प्रोग्रामचा भाग असते, ज्यामुळे ग्राहक समाधानी राहतात आणि प्रीमियम कार्ड वापरण्याची शक्यता वाढते.

बँका आणि लाउंज यांचं गणित

भारतात डोमेस्टिक लाउंजसाठी बँकांना प्रति व्हिजिट साधारण 600 ते 1200 रुपये मोजावे लागतात. आंतरराष्ट्रीय लाउंजसाठी हीच रक्कम 25 ते 35 डॉलर (सुमारे 2000–3000 रुपये) असते, जी प्रायोरिटी पास किंवा लाउंजकीसारख्या नेटवर्कद्वारे दिली जाते. म्हणजेच, तुम्ही केवळ 30 मिनिटांसाठी लाउंजमध्ये बसून सॅंडविच आणि कॉफी घेतली तरी त्याचा खर्च बँक भरते.

advertisement

लाउंजमध्ये प्रवेशाचे प्रकार

लाउंजमध्ये जाण्याचे चार प्रमुख मार्ग आहेत:

क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे मोफत प्रवेश.

प्रायोरिटी पास, लाउंजकी किंवा ड्रीमफोल्क्ससारखी आंतरराष्ट्रीय नेटवर्क सेवा.

पैसे भरून डे पास घेणे (साधारण 1500 ते 3000 रुपये).

एअरलाइनचं बिझनेस क्लास तिकीट किंवा खास स्टेटस.

लाउंज ऑपरेटरचा व्यवसाय मॉडेल

लाउंज ऑपरेटरांना प्रत्येक विजिटसाठी बँकांकडून मिळणारी रक्कम, मोठ्या प्रमाणातील ग्राहकसंख्या आणि केटरिंग तसेच एअरपोर्ट प्रशासनाशी असलेल्या भागीदारीतून नफा मिळतो. त्यांचा प्रति व्यक्ती मार्जिन खूप जास्त नसला तरी मोठ्या संख्येने लोक आल्यामुळे त्यांना चांगली कमाई होते. दुसरीकडे, बँकांनाही यात फायदा असतो कारण मोफत लाउंज एक्सेसमुळे लोक त्यांचे कार्ड अधिक वापरतात आणि पुढे प्रीमियम कार्ड घेण्याकडे वळतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याचे दर पुन्हा गडगडले, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

म्हणजेच, एअरपोर्ट लाउंज आता केवळ लक्झरी नसून एक स्मार्ट बिझनेस मॉडेल आहे. ज्यात प्रवाशांना मोफत वाटणारं सुख, बँका आणि लाउंज ऑपरेटर दोघांनाही फायदा करून देतं.

मराठी बातम्या/Viral/
एअरपोर्ट लाउंजवर फ्री खाऊन-पिऊन निघतात प्रवासी, मग त्याचे पैसे कोण देतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल