युरोपमधील नॉर्वे हा देश निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे वाइट माउंटन, नॉर्दर्न लाईट्स नेहमीच लोकांना आश्चर्यचकीत करतात. पण एवढच नाही तर इथल्या हिरव्या सुर्यानं देखील लोकांना आश्चर्यचकीत केलं आहे.
नॉर्वेमध्ये सूर्य काही क्षणांसाठी हिरवा रंग धारण करतो. विज्ञानाच्या भाषेत या नैसर्गिक घटनेला ‘ग्रीन फ्लॅश’ असे म्हटले जाते.
फक्त काही सेकंदांचा खेळ
advertisement
हिरवा सूर्य फार वेळ दिसत नाही. हा फक्त 2 ते 3 सेकंदांसाठीच दिसतो. शास्त्रज्ञांच्या मते, सूर्याच्या किरणांमध्ये अनेक रंग असतात. सूर्य क्षितिजावर असताना वातावरणातील प्रकाशाचे अपवर्तन होतं आणि त्या वेळी हिरवा आणि निळा रंग जास्त ठळकपणे दिसतो.
हा नजारा कधी आणि कुठे पाहता येतो?
हिरवा सूरज दिवसभर दिसत नाही. तो पाहण्यासाठी तुम्हाला सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनारी किंवा स्वच्छ, उंच जागी उभं राहावं लागतं. या घटनेचं निरीक्षण करण्यासाठी सोलर ग्लासेसचा वापर करणं योग्य ठरतं. कारण हा चमत्कार फक्त काही सेकंदांसाठीच दिसतो, त्यामुळे सूर्याच्या दिशेने एकटक नजर ठेवणं आवश्यक असतं.