फिलिपिन्समधल्या 27 वर्षांच्या एका मुलीचं लग्न ठरलं होतं. घरात आनंदाचा माहोल होतं, नातेवाईक जमलेले, कपडे तयार होते, सजावट पूर्ण झाली होती. सगळं अगदी स्वप्नासारखं सुरु होतं. पण जणू त्या स्वप्नाला कोणाची तरी नजर लागली आणि लग्नाच्या फक्त एक दिवस आधी धक्कादायक प्रकार घडला. खरंतर नवरदेवानं या लग्नाला नकार दिला आणि गायब झाला, ज्यामुळे नक्की काय घडलं हे विचारायची संधी देखील नववधूला मिळाली नाही.
advertisement
या प्रसंगी कुणीही दुसरी मुलगी असती तर खचून गेली असती, कदाचीत जगापासून पळाली असती किंवा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला असता पण या नववधूनं मात्र भलताच किस्सा केला. ती कुठेही गेली नाही उलट लग्नाच्या दिवशी ती सुंदर सजून ठरलेल्या ठिकाणी आली आणं आनंदाने आपल्याच फोटोशी तिनं लग्न केलं.
या नववधूला काहीही करुन याच मुहुर्तावर आणि याच मंडपात लग्न करायचं होतं, त्यामुळे तिने स्वत:शिच लग्न केलं. हा सगळा प्रकार पाहून उपस्थीत लोक देखील थक्क झाले. ज्यानंतर हा सगळा प्रकार सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. जो पाहून नेटकऱ्यांना ही हे सगळं विचित्र वाटलं.
पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
सोशल मीडियावर एका हातात फुलांचा गुलदस्ता तर दुसऱ्या हातात स्वत:चा फोटो घेऊन महिलेनं आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. काहींनी तिच्या धाडसाला सलाम केला. म्हणाले, “खरं प्रेम तेच, जे स्वतःवर करावं.” काहींनी हा प्रकार फक्त प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचं म्हटलं. तर काहींनी मजेत लिहिलं “आता भांडण झालं तर कोण सोफ्यावर झोपणार?”
आजही या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि लोक अजूनही हसत-हसत, थक्क होत त्यावर चर्चा करत आहेत.
