१) लात्व्हिया- उत्तर युरोपातील हा देश जगातील सर्वाधिक मद्य सेवन करणारा देश आहे. लात्व्हियामधील प्रत्येक व्यक्ती सरासरी १२.९ लीटर मद्य सेवन करते. सर्वात आवडते मद्य म्हणजे बिअर होय. सोबत लात्व्हियामध्ये मिळणारी खास रीगा ब्लॅक बालमस देखील फार प्रसिद्ध आहे.
२) चेक प्रजासत्ताक- मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताक देशाचा आणि मद्य सेवनाचा फार दिर्घकालीन इतिहास आहे. या देशातल सरासरी १२.७ लीटर मद्य सेवन केले जाते. चेक प्रजासत्ताक हा जगातील सर्वाधिक बिअर पिणारा देश आहे. येथील पिल्जेन्स्की प्राजड्रोज नावाचे मद्य फार प्रसिद्ध आहे.
advertisement
३) लिथुएनिया- मद्य सेवन करणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या या देशात सरासरी ११.९ लीटर मद्य घेतले जाते. लिथुएनियामध्ये मधापासून मीड नावाचे मद्य तयार केले जाते. हे या देशातील प्रसिद्ध पेय देखील आहे.
४) ऑस्ट्रिया- बिअर आणि वाइन यासाठी ऑस्ट्रिया लोकप्रिया आहे. येथे सरासरी ११.९ लीटर मद्य घेतले जाते. ऑस्ट्रियातील जिरबेनलीकोर नावाचे मद्य प्रसिद्ध आहे.
५) ॲंटिगा आणि बार्बुडा- हा देश रम साठी प्रसिद्ध आहे. या कॅरिबियन देशात सरासरी ११.८ लीटर मद्य घेतले जाते. रम पंच ही येथील लोकांचे आणि पर्यटकांचे आवडते पेय आहे.
६) एस्टोनिया- या देशात सरासरी ११.६ लीटर मद्य सेवन केले जाते. वाना टालिन ही रम या देशाचे राष्ट्रीय पेय आहे.
७) फ्रान्स- फ्रान्समधील वाइन ही जगप्रसिद्ध आहे. येथे सरासरी ११.४ लीटर मद्य सेवन केले जाते. शॅम्पेन आणि बिअर फ्रानमध्ये अधिक लोकप्रिय आहे.
८) बल्गेरियाचे प्रजासत्ताक- मध्य युरोपातील या देशात राकिया नावाचे मद्य फार लोकप्रिय आहे. या देशात ११.१ लीटर मद्य सेवन केले जाते. फळांपासून तयार करण्यात आलेली ब्रँडी ही बल्गेरियाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
९) स्लोव्हेनिया- हा एक वाइन उत्पादन देश आहे. येथे ११.०५ लीटर मद्य सेवन केले जाते. पेलिंकोवॅक जी एक हर्बल लिकर आहे, ते येथील खास पेय आहे.
१०) लक्झेंबर्ग- पश्चिम युरोपमधील फक्त २ हजार ५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेला हा देश मद्य सेवनात आघाडीवर आहे. येथे सरासरी ११ लीटर मद्य सेवन केले जाते. बिअर आणि वाइन येथे अधिक लोकप्रिय आहे.
या सर्व देशांची संस्कृती वेगवेगळी आहे. प्रत्येक देशाचे स्वत:चे असे खास पेय आहे. भारतात देखील मद्य मोठ्या प्रमाणात सेवन केले जात असेल तरी जगातील टॉप १० मध्ये आपल्या देशाचा समावेश नाही. भारतातील सरासरी मद्य सेवन अन्य देशांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसते. भारतात सरासरी ३.९ लीटर मद्य सेवन केले जाते. देशातील एकूण मद्य सेवनापैकी सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये १४.५ टक्के इतके तर महाराष्ट्रात १३.९ इतके सेवन होते.
