सोलापूर शहरात असलेल्या 70 फूट रोड येथे अंबादास विनायक कनकट्टी हे राहतात. सातवीमध्ये नापास झालेले अंबादास हे वयाच्या 10 वर्षाचे होते तेव्हापासून पशु-पक्ष्यांचे आवाज काढत आहेत. जेव्हा घरची परिस्थिती बिकट होती तेव्हा माणसे सुद्धा जवळ करत नव्हते. पक्ष्यांच्या सानिध्यात राहून अंबादास यांनी आवाज काढायला सुरुवात केली. तसेच त्या काळात टीव्ही सुद्धा नसायचा तेव्हा पक्ष्यांचा आवाज ऐकून त्यांच्यासारखे आवाज काढण्यास सुरुवात केली. आज अंबादास कनकट्टी मोर, पोपट, चिमणी, कावळा, कोकिळ, कुत्रा यांच्यासह जवळपास 70 हून अधिक पशु-पक्ष्यांचे आवाज काढत आहेत.
advertisement
पशु-पक्ष्यांचे आवाज काढून वाहिली होती श्रद्धांजली
नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले होते. तेव्हा अंबादास कनकट्टी यांनी त्यांना विविध पक्षांचे, प्राण्यांचे आवाज काढून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. तर स्वर्गीय मारुती चितमपल्ली यांच्यामुळेच साहित्य संमेलनामध्ये पक्षांचे आवाज काढण्याची संधी मिळाली होती. तेव्हा अंबादास कनकट्टी यांनी कावळ्यांचे आवाज काढून कार्यक्रमाच्या ठिकाणी कावळे जमा केले होते.
माणसाने पशु-पक्ष्यांचे संवर्धन करावे, तसेच निसर्गाचेही संवर्धन करावे कारण निसर्ग कधी आपल्याकडून काहीही मागत नसतो, उलट आपल्याला देत असतो. झाडे लावून झाडे जगवा, पशु-पक्षी वाचवा असा संदेश बर्डमॅन अंबादास कनकट्टी यांनी दिला आहे.