TRENDING:

संपूर्ण शहराचा नाश करणारा लघुग्रह, पृथ्वीवर कधी आदळणार; Photo शेअर करत NASAने तारीखच सांगितली

Last Updated:

Asteroid 2024 YR4 NASA Image: नासाने 22 डिसेंबर 2032 रोजी पृथ्वीला धडकण्याची शक्यता असलेल्या एस्टेरॉईड अर्थात लघुग्रहाचा फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा लघुग्रह आदळण्याची शक्यता किती आहे आणि त्यापासून पृथ्वीला किती धोका आहे जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
न्यूयॉर्क: अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने पृथ्वीला धडकण्याची शक्यता असलेल्या लघुग्रहाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. YR4 असे नाव देण्यात आलेल्या हा लघुग्रह 22 डिसेंबर 2032 रोजी पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. नासाने दिलेल्या या इशाऱ्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
News18
News18
advertisement

नासातील वैज्ञानिकांच्या मते लघुग्रहची पृथ्वीला धडकण्याची शक्यता 1.8% वरून 2.3% झाली आहे. हा लघुग्रह जवळपास 300 फूट (90 मीटर) व्यासाचा असू शकतो, जो एका संपूर्ण शहराचा नाश करण्यास पुरेसा आहे.

तुंगुस्का घटनेसारखी स्थिती निर्माण होणार?

1908 मध्ये रशियाच्या तुंगुस्का प्रदेशात एका लघुग्रहच्या स्फोटामुळे 2,150 चौरस किमीचा परिसर नष्ट झाला होता. हा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच फुटला होता. ज्यामुळे मोठा खड्डा पडला नाही, पण लाखो झाडे नष्ट झाली होती. वैज्ञानिकांच्या मते जर 2024 YR4 पृथ्वीवर आदळला, तर तो एका संपूर्ण शहराचा नाश करू शकतो.मात्र त्यामुळे पृथ्वीवर कोणतेही महासंकट येणार नाही.

advertisement

YR4 धडकेची शक्यता किती?

युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) मते 22 डिसेंबर 2032 रोजी हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. ESAच्या अंदाजानुसार 99% शक्यता आहे की तो पृथ्वीला धडकणार नाही, पण तो अत्यंत जवळून जाईल. हा लघुग्रह "टोरीनो इम्पॅक्ट स्केल" वर 3 क्रमांकावर आहे. हा स्केल 0 ते 10 पर्यंत मोजला जातो. जिथे 0 म्हणजे कोणताही धोका नाही आणि 10 म्हणजे महाप्रलय होऊ शकतो.

advertisement

लघुग्रहला थांबवण्याची योजना काय?

NASA कडे लघुग्रहच्या धडकेचा धोका कमी करण्यासाठी योजना देखील आहे . 2022 मध्ये DART (Double Asteroid Redirection Test) मिशन अंतर्गत NASAने एक स्पेसक्राफ्ट जाणूनबुजून लघुग्रहवर आदळवला होता. ज्यामुळे त्याची दिशा बदलली. जर 2024 YR4 लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता वाढली तर DART सारखी तंत्रज्ञान पद्धत पुन्हा वापरण्यात येऊ शकते.

advertisement

सध्या घाबरण्याची गरज नाही

YR4 लघुग्रहच्या हालचालींचे अधिक अचूक निरीक्षण करणे आवश्यक आहे. आगामी काही महिन्यांत अधिक माहिती स्पष्ट होईल आणि याच्या धडकेची शक्यता जवळपास शून्यावर जाऊ शकते. त्यामुळे सध्या घाबरण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मराठी बातम्या/Viral/
संपूर्ण शहराचा नाश करणारा लघुग्रह, पृथ्वीवर कधी आदळणार; Photo शेअर करत NASAने तारीखच सांगितली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल