TRENDING:

बांगलादेशची 'सायलेंट किलर'! उडत आली आणि 1 लाख लोकांचा घेतला जीव, सगळे दहशतीत

Last Updated:

Bangladesh silent killer : बांगलादेशच्या सायलेंट किलरमुळे दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. तर 5 हजारांहून अधिक बालकं मृत्यूच्या मार्गावर आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ढाका : बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनामुळे गेल्या काही महिन्यांत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्याची खूप चर्चा झाली होती. पण आता असा अहवाल आला आहे, ज्यामध्ये बांगलादेशात एक अशी सायलेंट किलर जिच्यामुळे एका वर्षात तब्बल एक लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

बांगलादेशमध्ये लाखो लोकांचा जीव घेणारी सायलेंट किलर आहे तिथली हवा.  विषारी हवेला तिथं सायलेंट किलर म्हटलं जात आहे.  वायू प्रदूषणामुळे बांगलादेशमध्ये गेल्या एका वर्षात 102,456 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

वायू प्रदूषणाचा अहवाल

advertisement

बांगलादेशच्या सेंटर फॉर रिसर्च एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालानुसार, बांगलादेश 2023 मध्ये जगातील सर्वात प्रदूषित देश मानला गेला. तिथं PM2.5 चे मूल्य 79.9 µg/m³ आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा 15 पट जास्त आहे.

लहान मुलांचे कपडे चुकूनही रात्री घराबाहेर सुकवू नका, अंधश्रद्धा नाही यामागे आहे वैज्ञानिक कारण

advertisement

PM2.5 हा प्रदूषणाचा उत्कृष्ट कण आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचा कॅन्सर असे आजार होत आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांना होत आहे. दरवर्षी 5,258 मुलांचा यामुळे मृत्यू होत आहे.

मुलांचा अकाली जन्म, वृद्धांवरही परिणाम

advertisement

द डेली स्टारच्या वृत्तानुसार, वायू प्रदूषणामुळे दमा होत आहे. बाळ प्रसूती वेळेपूर्वीच जन्माला येत आहेत. एवढेच नाही तर सहन करण्याची क्षमताही कमी होत आहे. आजारांचा परिणाम वृद्धांवर होत आहे. असे अनेक आजार होत आहेत जे आयुष्यभर बरे होत नाहीत आणि लोकांना त्रास देत आहेत.

advertisement

Chanakya Niti : महिला-पुरुषांनो जरा जपूनच! तारुण्यात उत्साहात 'हे' बिलकुल करू नका

सीआरईएचे वायु गुणवत्ता विश्लेषक डॉ. जेमी केली म्हणाले, बांगलादेशातील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी हजारो मुलं वेळेआधीच जन्माला येतात. त्यांचं वजन कमी असतं. अनेक मुले जन्माला येताच मरतात. ही समस्या गरीब कुटुंबांमध्ये सर्वाधिक आहे.

वय घटलं

CAPS चे अध्यक्ष प्राध्यापक अहमद कमरुझमान मजुमदार म्हणाले, ढाक्यातील वाढत्या वायू प्रदूषणाचा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. वायु गुणवत्ता जीवन निर्देशांक 2024 च्या अहवालात असं दिसून आलं आहे की वायू प्रदूषणामुळे लोकांचे आयुर्मान 4.8 वर्षांनी कमी झालं आहे. कारखान्यांमधून निघणारा धूर, घरातून निघणारी घाण यासह अनेक गोष्टी प्रदूषण वाढण्यास कारणीभूत आहेत.

...तर वाचतील जीव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

CREA अहवालात दावा करण्यात आला आहे की, देशातील हवेची गुणवत्ता सुधारली तर मृत्यूचं प्रमाण 19 टक्क्यांनी कमी होऊ शकतं आणि WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं तर दरवर्षी 81,282 लोकांचे प्राण वाचू शकतात. इतकंच नाही तर यामुळे लोकांचे आयुर्मान 21 टक्क्यांनी वाढू शकते.

मराठी बातम्या/Viral/
बांगलादेशची 'सायलेंट किलर'! उडत आली आणि 1 लाख लोकांचा घेतला जीव, सगळे दहशतीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल