एका बायकोने तिच्या नवऱ्याला दिलेलं बर्थडे सरप्राईझ. आता कपलमध्ये बर्थडे सरप्राईझ म्हटलं तर तुम्ही सामान्यपणे पाहिलं असेल. एखादी हॉटेलची रूम बुक करून किंवा घराचं बेडरूम सजवलं जातं. बर्थडे असलेल्या व्यक्तीला डोळे बंद करून फुलांच्या पायघड्या टाकून तिथपर्यंत आणलं जातं. या व्हिडीओतही बायकोने अगदी तसंच केलं आहे. पण शेवटी एक जबरदस्त ट्विस्ट आहे. असा ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नसेल.
advertisement
बोंबला! 4 मुलांचे आईबाप, पती-पत्नी पडले एकाच तरुणीच्या प्रेमात, मग काय झालं तुम्हीच वाचा
व्हिडीओ तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती ज्याच्या खांद्यावर हॅप्पी बर्थडेची रिबन आहे. त्याच्या डोळ्यावर पट्टी आहे. खाली गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या आहेत. ज्यावरून ती व्यक्ती चालत येते. व्हिडीओत एका महिलेचा आवाज ऐकायला येतो जी या व्यक्तीची बायको आहे आणि ती त्याला कसं यायचं ते सांगते आहे. कारण त्याच्या डोळ्यावर पट्टी आहे.
शेवटी ती व्यक्ती एका रूमच्या दरवाजावर येऊन पोहोचते आणि त्याची बायको त्याला डोळ्यावरची पट्टी हटवायला सांगते. जसा तो पट्टी हटवतो तसा तो अवाक होतो. त्यानंतर कॅमेरा त्या रूमकडे जातो आणि मग तुम्हालाही जोर का झटका बसेल. कारण हा बेडरूम नाही तर बाथरूम आहे. महिलेने आपल्या नवऱ्याच्या बर्थडेसाठी टॉयलेट सजवलं आहे. हे थोडं विचित्र वाटेल पण तिने असं का केलं याचं कारणही याच व्हिडीओत आहे. तिचा नवरा बराच वेळ बाथरूममध्ये बसलेला असतो. त्यामुळे तिने त्याला असं सरप्राईझ दिलं आहे.
@shesa_vlogs इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिलेचा नवरा म्हणतो की हे कुणीच कॉपी करू शकणार नाही. व्हिडीओ पाहिल्यावर यावर अशाच कमेंट आल्या आहेत. आपण असा स्वप्नातही विचार केला नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. सामान्यपणे सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ पाहिला की तसं करण्याकडे लोकांचा कल असतो. आता हे असं बर्थडे सरप्राईझ तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही असं बर्थडे सरप्राईझ देणार का? आणि कुणाला? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.