VIDEO : 'क्या मस्त फिगर है....मेरे साथ चलेगी....' रोड रोमिओचे शब्द ऐकताच शाळकरी मुलीचं धाडसी कृत्य, रस्त्यातच दिला चोप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक धाडसी प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे आणि चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई : भारतातील अनेक स्त्रियांना दररोज छेडछाड, अश्लील टिप्पण्या, पाठलाग आणि धमक्यांना सामोरं जावं लागतं. रस्त्यावर, सार्वजनिक वाहतूकीमध्ये, बाजारात किंवा अगदी स्वतःच्या परिसरातसुद्धा महिलांना असुरक्षित वाटतं. बर्याच काळापर्यंत समाजाने याकडे डोळेझाक केली आणि पीडित महिलांनाच दोष दिला. बहुतांश महिला ही या अशा गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि पण याचाच फायदा घेत काही रोडसाईड रोमीओ अशापद्धतीची छेडछाड करत असतात. पण हळूहळू परिस्थिती बदलत आहे. आज अनेक महिला आवाज उठवत आहेत, काही वेळा स्वतःच छेडछाड करणाऱ्यांना धडा शिकवत आहेत.
असाच एक धाडसी प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे आणि चर्चेचा विषय ठरत आहे. शाळेत शिकणाऱ्या एका तरुणीचा वारंवार पाठलाग करून त्रास देणाऱ्या एका तरुणाला तिने सार्वजनिक ठिकाणी थेट धडा शिकवला. याचाच हा व्हिडीओ आहे, जो व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही तरुणी आरोपीला रस्त्यावरच कानशिलात मारताना, चप्पलांनी मारहाण करताना आणि हातात वीट उचलून धमकावताना दिसते. एवढंच नाही तर तिने त्या तरुणाला कॉलरला धरून जोरदार सुनावलं. हा प्रकार युपीमधील गंगाघाट कोतवाली परिसरातील पोनी रोडवर घडली. जी शनिवारी घडली, आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला.
advertisement
आरोपीची ओळख 20 वर्षीय आकाश अशी झाली आहे, जो ई-रिक्शा चालक आहे आणि तो पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचं कामही करतो. TOIच्या वृत्तानुसार तो काही दिवसांपासून या मुलीचा पाठलाग करत होता आणि अश्लील टिप्पणी करत होता. घटनेच्या दिवशी त्याने मुलीचा रस्ता अडवून जबरदस्तीने सोबत येण्याचा आग्रह धरला. तेव्हा संतापलेल्या मुलीने प्रतिकार केला आणि त्याला रस्त्यावरच चोप दिला.
advertisement
तरुणीचं असं म्हणणं आहे की आरोपी तिला खूप घाणेरड्या शब्दात कमेंट करायचा. क्या 'मस्त फिगर है....मेरे साथ चलेगी....क्या साइज़ है...' वैगरे-वैगरे अखेर जेव्हा तरुणीला ही सहन झालं नाही तेव्हा चिडून तिने याला विरोध केला.
क्या मस्त फिगर है....मेरे साथ चलेगी....क्या साइज़ है...
उन्नाव के गंगा घाट कोतवाली के पास आकाश हर रोज खड़ा होकर लड़कियों पर ऐसे ही भद्दी भद्दी अश्लील फब्तियां कसता था।
और फिर इस बहादुर बेटी ने बीच सड़क आकाश को जमकर पीटा। लोग तमाशा देखते रहे वीडियो बनाते रहे लेकिन कोई इस बेटी का… pic.twitter.com/SB5MMs7bL8
— Kavish Aziz (@azizkavish) July 28, 2025
advertisement
मुलीने पोलिसांकडे औपचारिक तक्रार दिली नसली तरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
महिला की बहादुरी काबिल-ए-तारीफ है — जिस तरह से इस बेटी ने सरेआम अपने सम्मान के लिए लड़ाई लड़ी, वह उन सभी लड़कियों और महिलाओं के लिए प्रेरणा है जो अक्सर ऐसे मौकों पर चुप रह जाती हैं।
समाज की उदासीनता शर्मनाक है — वहाँ मौजूद लोगों ने मदद करने की बजाय वीडियो बनाना ज़्यादा जरूरी… pic.twitter.com/d8mwotuzXE
— Nitish Kumar Yadav (@ni30krydv) July 28, 2025
advertisement
ज्या देशात अजूनही पीडित महिलांनाच दोष दिला जातो, तिथे या तरुणीचं धाडस हे प्रेरणादायी आहे. तिने हा केवळ स्वतःसाठी लढा दिला नाही, तर प्रत्येक त्या मुलीचं प्रतिनिधित्व केलं आहे, जिला कधी ना कधी रस्त्यावर असुरक्षित वाटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2025 5:55 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : 'क्या मस्त फिगर है....मेरे साथ चलेगी....' रोड रोमिओचे शब्द ऐकताच शाळकरी मुलीचं धाडसी कृत्य, रस्त्यातच दिला चोप