या व्हिडीओत एक तरुण रस्त्यावर स्केटिंग करु पाहात आहे. ते ही एका कारच्या मदतीने. तेव्हाच या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला. या व्हिडिओमधील मुलाला स्टंटबाजी केल्यामुळे अटक झाली.
हा तरुण एका कारच्यामागे स्केटिंगने जात होता. तेव्हाच त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. त्याची धडक इतकी जोरात होती की तो थेट उडाला, तो घाबरुन मागून येणाऱ्या गाडीला पाहू लागला. नशिबाने मागच्या बाईक चालकाने हुशारी दाखवत बाजूला गाडी नेली, ज्यामुळे या तरुणाचा जीव वाचला.
advertisement
या तरुणाला दुखापती झाली असावी, परंतू त्याचं नशीब चांगलं असल्यामुळे प्राण मात्र वाचले आहेत.
हा व्हिडीओ X वर Nikky Mathur नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'नक्कीच तुम्ही प्रत्येक गेम हराल... पण आयुष्याचा खेळ गमावू नका. शेवटाची वाट पहा.' ज्याला अगदी काही वेळात लाखो व्ह्यूज आले आहेत, लोक या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत.