इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. तुमच्या आमच्यासारखाच हा तरुण इलेक्ट्रॉनिक्स दुकानात स्पीकर घ्यायला गेला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता व्हिडीओत तरुण आणि दुकानदार दोघंही मोबाईलमध्ये पाहत आहेत. बाजूला स्पीकरचा बॉक्स दिसतो आहे, जो खुला आहे आणि त्यातील स्पीकर बाहेर काढलेला आहे. यावरून हा मुलगा स्पीकर खरेदी करायला गेला असंच दिसून येतं.
advertisement
दुकानदार नंतर त्या तरुणाच्या हातात माईक देतो. एका हातात माईक आणि दुसऱ्या हातात मोबाईल धरून हा तरुण उभा राहतो. दुकानदारही एका बाजूला हाताची घडी घालून त्या तरुणाकडे पाहत राहतो.
थोड्या वेळाने जे होतं त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत. तरुण मोबाईलमध्ये गाण्याचे बोल पाहत गाणं गातो. लिखे जो खत तुझे हे शशी कपूर आणि आशा पारेख यांच्या कन्यादान फिल्ममधील गाणं. मोहम्मद रफी यांनी गायलेलं. तरुणानेसुद्धा हे गाणं खूप छान आवाजात गायलं आहे. ज्याला तोडच नाही. एकदा ऐकलं की ऐकतच राहावं असा त्याचा आवाज आहे.
kumarmj_81 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर या मुलाचे गाण्याचे असे बरेच व्हिडीओ आहेत. त्याच्या प्रोफाईलवर त्याने गायक असल्याचं सांगितलं आहे. प्रोफाईलवरील माहितीनुसार तो प्रयागराजचा आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी तरुणाचं कौतुक केलं आहे. त्याचा आवाज खूप छान असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.