एका बेडशीटपासून 99 ड्रेस... तेसुद्धा न कापता, न शिवता. वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण एका मुलाने ते करून दाखवलं आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलाने फक्त ड्रेस बनवले नाहीत तर ते घालून त्याने रॅम्प वॉकही केला आहे.
काय म्हणावं आता याला! चोरी होण्याच्या भीतीने प्रायव्हेट पार्टला लावला लॉक
advertisement
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक बेडशीट वापरून हा मुलगा वेगवेगळे लूक क्रिएट करतो. एका बेडशीटला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वापर करून त्याने एक नवीन लूक तयार केला आहे. कधी गाऊन, कधी स्कर्ट किंवा ट्रेडिशनल ड्रेस. तो प्रत्येक ड्रेसमध्ये रॅम्प वॉक देखील करतो. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
व्हिडीओत या मुलाने तयार केलेले सगळे 99 ड्रेस तर दाखवण्यात आले नाहीत. पण व्हिडीओवर एका बेडशीटपासून 99 ड्रेस असं लिहिण्यात आलं आहे. पण व्हिडीओत जितके ड्रेस दिसत आहेत त्यामुळे लोक त्याची सर्जनशीलता आणि फॅशन सेन्स पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. हे सर्व फक्त एकाच कापडाचा वापर करून साध्य केलं आहे यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. युझर्सनी कमेंटमध्ये हा फॅशन डिझायनरपेक्षा कमी नाही, असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.
Fashion Jugaad : संपूर्ण साडी नीट नेसून झाली, पण पदराची अशी एक प्लेट बाहेर आली तर काय करायचं?
तसे हे ड्रेस दैनंदिन जीवनात आपण घालू शकत नाही. पण मुलाच्या कलाकारीला दाद द्यायला हवी. तुम्हाला बेडशीटपासून बनवलेले हे ड्रेस कसे वाटले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.