Fashion Jugaad : संपूर्ण साडी नीट नेसून झाली, पण पदराची अशी एक प्लेट बाहेर आली तर काय करायचं?

Last Updated:

Saree Plate fixing Tips : आम्ही तुम्हाला आता अशी ट्रिक दाखवणार आहोत की पदर पुन्हा न काढता तुम्ही साडीचं ही बाहेर आलेली प्लेट किंवा पदराचं टोक, भाग फिक्स करू शकता.

News18
News18
मुंबई : भारतात बऱ्याच महिला साडी नेसतात. कोणतीही महिला असो, आयुष्यात किमान एकदा तरी साडी नेसण्याचा योग येतो. साडी नेसणं हीसुद्धा एक कला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण साडी नेसताना सगळ्यात आव्हानात्मक टास्क असतो तो म्हणजे पदर आणि निऱ्यांचा. पदर काढल्यानंतर त्याचं एक टोक असं बाहेर येतं, मग अशावेळी काय करायचं?
संपूर्ण साडी नेसून झाल्यावर पदराचं एक टोक जरी बाहेर आलं तरी संपूर्ण मेहनत वाया गेल्याचं फिलिंग येतं. आता परत पदर सोडावा लागणार, पुन्हा प्लेटिंग करावी लागणार असं वाटतं. आधीच इतक्या मेहनतीने साडी नेसलो, इतका वेळ गेला. आता संपूर्ण साडी नीट आहे फक्त पदराच्या एक टोकासाठी पुन्हा वेळ नाही. पण डोंट वरी. आम्ही तुम्हाला आता अशी ट्रिक दाखवणार आहोत की पदर पुन्हा न काढता तुम्ही साडीचं हे बाहेर आलेलं टोक किंवा प्लेट फिक्स करू शकता.
advertisement
अगदी सोपी आणि साधी अशी ही पद्धत आहे. तुम्हाला करायचं काय आहे तर पदराची जे प्लेट बाहेर आली आहे त्याच्या वरच्या प्लेट मानेच्या दिशेने फोल्ड करून घ्या. आता जी प्लेट बाहेर आली आहे. ती आतल्या बाजूने फोल्ड करा आणि त्यावर सेफ्टी पिन लावा. आता त्याच्या वरच्या प्लेट ज्या आपण मानेच्या दिशेने दुमडल्या होत्या त्या पुन्हा या पदरावर सोडा. तुम्ही स्वतःच पाहाल की ते बाहेर आलेलं टोक आत गेलं, बिलकुल दिसत नाही आहे.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fashion Jugaad : संपूर्ण साडी नीट नेसून झाली, पण पदराची अशी एक प्लेट बाहेर आली तर काय करायचं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement