काय म्हणावं आता याला! चोरी होण्याच्या भीतीने प्रायव्हेट पार्टला लावला लॉक

Last Updated:

Man locked Private Part : सुरुवातीला त्या माणसाने ते सहन करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा लघवी करण्याची वेळ आली तेव्हा त्याची प्रकृती आणखी बिकट झाली.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली : सामान, पैसा, दागिने चोरीला जाण्याची भीती असते म्हणून कपाट किंवा घराला आपण लॉक लावतो. पण एका व्यक्ती प्रायव्हेट पार्टला चोरीला जाण्याच्या भीतीने प्रायव्हेट पार्टलाच लॉक लावला आहे. थायलंडच्या बुरीराम प्रांतातील ही धक्कादायक घटना आहे.
6 ऑक्टोबर रोजी सॅटुएक रुग्णालयात एक रुग्ण आला. ज्याने आपल्या प्रायव्हेट पार्टला लॉक लावला होता. त्याने आपलं गुप्तांग दोन अंगठ्यांनी बंद केलं. त्यामुळे त्याला सूज आली होती. ते इतकं सुजलं की त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली. त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला त्या माणसाने ते सहन करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा लघवी करण्याची वेळ आली तेव्हा त्याची प्रकृती आणखी बिकट झाली. सूज आल्यामुळे लघवी करणं कठीण झालं. तो वेदनेने ओरडू लागला. शेवटी जेव्हा तो सहन करू शकला नाही, तेव्हा तो थेट रुग्णालयात गेला.
advertisement
डॉक्टर आणि परिचारिका त्याची अवस्था पाहून थक्क झाले.  रिंग इतक्या घट्ट होत्या की त्यामुळे रक्ताभिसरण बंद झालं आणि टोकाला गंभीर सूज आली. अंगठ्या लावल्यामुळे त्याचा गुप्तांग मुठीएवढा सुजला होता. रुग्णालयात अशा प्रकरणांसाठी विशेष कटिंग साधने नसल्याने, वांग क्रूड फाउंडेशनच्या बचाव पथकाला तात्काळ बोलावण्यात आलं. पथक 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि ग्राइंडिंग मशीन वापरून दोन्ही रिंग काळजीपूर्वक कापल्या. प्रक्रियेदरम्यान कोणतीही दुखापत झाली नाही. पण रिंग काढल्यानंतरही सूज कायम राहिली.
advertisement
बचाव पथकाचे सदस्य नारोंग सेंगप्रासर्ट म्हणाले, "आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा आम्हाला स्थिती पाहून धक्का बसला. रिंग इतक्या घट्ट होत्या की रक्त प्रवाह पूर्णपणे थांबला होता. त्वचेला नुकसान होऊ नये म्हणून आम्ही त्या हळूहळू ग्राइंडरने कापल्या. पण काढून टाकल्यानंतरही सूज कमी झाली नाही. अशा घटना दुर्मिळ असल्या तरी, थायलंडमध्ये यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत.
advertisement
डॉक्टरांनी त्या व्यक्तीला वेदनाशामक औषधं दिली आणि सूज कमी करण्यासाठी आइस पॅकचा सल्ला दिला. त्या माणसानं सांगितलं की, त्याचं लिंग असामान्यपणे मोठं होतं, त्यामुळे त्याला 69 मिलीमीटरचा अतिरिक्त-मोठा कंडोम वापरावा लागला. या आकारामुळे त्याला कोणीतरी ते चोरेल अशी भीती वाटू लागली. त्याने दावा केला की एका कम्युनिटी हेल्थ वॉलंटियरने ते चोरण्याचा प्रयत्न केला होता. या भीतीने त्याने प्रायव्हेट पार्टवर स्वतः दोन रिंग बसवल्या, एक प्लॅस्टिकची आणि दुसरी स्टेनलेस स्टीलची, जी मूळतः मासेमारीच्या रॉडचा भाग होती. त्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टची चोरी होऊ नये म्हणून त्याभोवती रिंग लावल्या.
मराठी बातम्या/Viral/
काय म्हणावं आता याला! चोरी होण्याच्या भीतीने प्रायव्हेट पार्टला लावला लॉक
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement