उत्तर प्रदेशच्या बरेलीतील ही घटना. लग्नाच्या पहिल्या रात्री वर वधूला स्पर्श करायला गेल्यानंतर तिने त्याचा हात झटकला. यावर नवरदेवाने तिला हसत आणि शांतपणे विचारलं की तू रागावली आहेस का? काही असेल तर शेअर कर.
पण वधूला नवऱ्याचा तिच्याशी बोलण्याचा प्रेमळ मार्ग आवडला नाही. ती म्हणाली, हे लग्न नाही तर एक सक्ती आहे. हे ऐकून तो तरुणही थोडा रागावतो आणि म्हणाल, तू मला आणि मी तुला पसंत केलं आहे, यात जबरदस्ती कसली. कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने हे लग्न झालं आहे. यावर नवरी निर्लज्जतेच्या सर्व मर्यादा ओलांडते आणि हसून म्हणते की मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते, मी फक्त त्याची आहे, मला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे.
advertisement
नवरात्रीचा उपवास, पूजा आणि त्यात पीरियड आले, महिलेने स्वतःचं आयुष्यच संपवलं
नवरी इतक्यावरच थांबली नाही ती नवऱ्याला म्हणाली, जर तू फसवणूक करूनही बळजबरी केलीस तर मी पोलिसांकडे जाऊन सांगेन की माझ्या सासऱ्यांनी माझा छळ केला आहे, अन्यथा मी विष पिऊन जीव देईन. तू मला सोडून जा, माझ्या घरात असं दिसलं पाहिजे की तू मला सोडून गेला आहेस, मी तुला नाही. जर तू असं केलं नाहीस तर मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकेन आणि तुझ्या वडिलांवरही छेडछाडीचा आरोप करेन.
पत्नीचे म्हणणं ऐकल्यानंतर वराच्या लग्नाची पहिली रात्र काही क्षणात नरकात बदलते. काय करावं त्यालाही सुचेनासं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो सर्वात आधी त्याच्या सासरच्यांना फोन करून सर्व काही सांगतो. पण मग मुलीचा भाऊ त्याला जीवे मारण्याची आणि पोलीस खटल्याची धमकी देऊ लागतो. मुलीचा भाऊ म्हणतो की जर तू माझ्या बहिणीला सोडून गेलास किंवा त्रास दिलास तर मी तुझ्या संपूर्ण घराचं असं काही करेन ज्याची तू कल्पनाही केली नसेल. एके दिवशी मुलीचा भाऊ आणि आई येऊन संपूर्ण घर जिवंत जाळण्याची धमकी देऊ लागले.
3-4 तासांत मॉडेलसोबत कसे पॉर्न शूट करायचे नवरा-बायको, शेजाऱ्यांनी सगळं सांगितलं
तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला दररोज त्रास होत होता तरुणाचं संपूर्ण कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगू लागलं. शेवटी हा तरुण पोलीस स्टेशनमध्ये गेला. तरुणाने बारादरी पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझे लग्न या वर्षी जानेवारीमध्ये झाले. तेव्हापासून मी माझ्या पत्नीशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत, त्यामागील कारण तिने दिलेल्या धमक्या आहेत. लग्नापासून माझं संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे, मी माझ्या पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आणि तिचा भाऊ मला जगू देत नाहीत. तिचा एक भाऊ बदमाश आहे जो जवळजवळ दररोज मला जीवे मारण्याची धमकी देतो. माझी आई हार्ट पेशंट आहे. हे सर्व पाहून ती खूप तणावात आली आहे. संपूर्ण घराचे वातावरण बिघडलं आहे.
प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलिसांनी पत्नीसह चार जणांविरुद्ध तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.