अर्चा एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. 1 मे रोजी तिचं लग्न ए.के.अर्जुन नावाच्या तरुणाशी झालं. लग्नानंतर सासरी आलेल्या अर्चाने तिचे दागिने काढून पिशवीत ठेवले आणि पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये कपड्याच्या कपाटात ठेवले. रात्री 9 च्या सुमारास, अर्चाने कपाट उघडलं तेव्हा तिला लक्षात आलं की दागिने गायब आहेत.
अरे देवा! सून म्हणून हे कुणाला आणलं, नवरीबाईचं खरं रूप समोर, सासर हादरलं
advertisement
दागिन्यांची किंमत सुमारे 22 लाख रुपये होती. अर्चाच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. त्यांनी सर्व पाहुण्यांची यादी बनवली आणि शोध सुरू केला. पण काहीच सुगावा लागला नाही.
पण दोन दिवसांनी असं काही घडलं की सर्वांनाच धक्का बसला. 7 मे रोजी सकाळी जेव्हा पोलीस पुन्हा एकदा घराभोवती तपासणी करत होते, तेव्हा घरापासून फक्त दोन मीटर अंतरावर झुडपांमध्ये एक पांढरी कापडी पिशवी आढळली. खरं तर, चोराने लग्नाच्या दिवशी चोरीला गेलेले सर्व दागिने दोन दिवसांनी घराजवळ पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवले. ज्यामध्ये बांगड्या, हार, बेल्ट, अंगठ्या, कानातले सर्वकाही शाबूत होतं.
Wedding News : नवरीच्या एंट्रीने नवरदेवाचा थरथराट! वधूचा चेहरा पाहताच थरथर कापू लागला
पोलीस उपनिरीक्षक सनीथ सी. म्हणाले, 'एकही दागिना हरवला नव्हता.' चोराने पश्चात्ताप किंवा भीतीपोटी दागिने परत केले आहेत असं दिसतं. फिंगरप्रिंट टीमने बॅग आणि दागिन्यांमधून नमुने गोळा केले आहेत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे बोटांचे ठसे देखील घेतले जात आहेत.