TRENDING:

बैलानं घेतला ‘रुफ टॉप’चा शॉर्टकट; Video शेवटपर्यंत पाहा मग कळेल खरा प्रॉब्लम, घडलेला प्रकार खूपच भारी

Last Updated:

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मोठा धिप्पाड असा बैल चक्क घराच्या छतावर जाऊन उभा राहिलाय.... होय, तुम्ही बरोबर वाचलं. बैल, तोही एवढा मोठा प्राणी, छतावर कसा काय गेला हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण त्यामागचं कारण ऐकल्यावर तुम्हीला नक्कीच हसू आवरणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्राण्यांशी संबंधीत कधीकधी अशा काही गोष्टी समोर येतात, ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. काही वेळा कुत्रे, मांजरे किंवा पक्ष्यांच्या खोड्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात आणि लोक त्यावर हसतात. असे व्हिडीओ लोक शेअर देखील करतात. पण कधीकधी प्राण्यांशी संबंधीत काही व्हिडीओ धोकादायक देखील ठरतात. आता तुम्ही कुत्रांना पाहून घाबरणारे, लांब पळणाऱ्या लोकांचे व्हिडीओ तर पाहिले असतील, पण एक थोडासा वेगळा आणि हटके असा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्हाला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळणार नाही.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मोठा धिप्पाड असा बैल चक्क घराच्या छतावर जाऊन उभा राहिलाय.... होय, तुम्ही बरोबर वाचलं. बैल, तोही एवढा मोठा प्राणी, छतावर कसा काय गेला हा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण त्यामागचं कारण ऐकल्यावर तुम्हीला नक्कीच हसू आवरणार नाही.

नेमकी घटना कुठली?

हा व्हिडीओ तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातल्या निराल गावाचा आहे. दोन वेगवेगळ्या टोकाला काढलेले हे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेत. व्हिडीओमध्ये बैल शांतपणे छतावर उभा असल्याचं दिसतं.

advertisement

बैल छतावर गेला तरी का?

खरं तर या बैलावर काही कुत्र्यांनी अचानक हल्ला केला होता. सुरुवातीला बैलानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्यांचा हल्ला इतका तीव्र होता की अखेर त्यानं पळ काढला. गावभर "बैल पुढे आणि कुत्रे मागे" असं अक्षरशः पकडा-पकडीचं नाट्य रंगलं. पळता पळता बैलाला एका घराजवळ दगडांचा आधार दिसला. जीव वाचवण्यासाठी त्यानं क्षणाचाही विलंब न लावता सरळ त्या घराच्या छतावर उडी मारली आणि तिथेच थांबून राहिला.

advertisement

गावकऱ्यांची गंमत

गावकऱ्यांनी हे दृश्य मोबाईलमध्ये टिपलं आणि सोशल मीडियावर अपलोड केलं. पाहता पाहता हा व्हिडीओ जोरात व्हायरल झाला. कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी बैल छतावर चढतोय हे पाहून लोकांना हसूही आलं आणि आश्चर्यही वाटलं.

https://youtu.be/Bi5japRAu20?si=tcX3mRqf8SOknco8

खरंच बैल कुत्र्यांना घाबरतात का?

साधारणपणे कुत्र्यांना माणसं घाबरतात हे आपण ऐकतो, पण धिप्पाड बैलही कुत्र्यांच्या भुंकण्याने एवढा घाबरेल, हे खरंच अनोखं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे आणि लोक यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
बैलानं घेतला ‘रुफ टॉप’चा शॉर्टकट; Video शेवटपर्यंत पाहा मग कळेल खरा प्रॉब्लम, घडलेला प्रकार खूपच भारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल