दिल्ली येथील लव कुमार यांच्यासोबत ही घटना घडली. या दिवाळीला त्यांचे नशिबच पालटले आहे. ते आपल्या नातेवाईकांच्या घरी पंजाबच्या नंगल याठिकाणी आले होते. येथे त्यांनी 500 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केली. याच तिकिटाने त्यांचे नशिब बदलले. यामध्ये त्यांना 3 कोटी रुपयांची लॉटरी लागली.
दिवाळीच्या निमित्ताने पंजाब राज्य सरकारने डिअर दिवाळी बंपर लॉटरी 2024 जाहीर केली होती. या लॉटरीचा निकाल जाहीर झाला. सहा कोटी रुपयांचे या लॉटरीचे पहिले बक्षीस दोन विजेत्यांमध्ये विभागून देण्यात आले. ही लॉटरी पंजाब राज्यातील सर्वात मोठी लॉटरी मानली जाते. यामध्ये यावेळीही हजारो लोकांनी आपले नशीब आजमावले होते.
advertisement
या लॉटरीमध्ये 3 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर लव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, त्यांनी जिंकलेली ही पहिलीच लॉटरी आहे. ही सर्व रक्कम सर्वात मोठी प्रेरणा असलेल्या माझ्या आईला देणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या विजयामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन मुलांच्या आईला व्हायचंय पोलीस, करतेय कठोर मेहनत, प्रेरणादायी कहाणी
पहिला 6 कोटी रुपयांचा पुरस्कार दोन लोकांना विभागून देण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक विजेत्याला 3-3 कोटी रुपये मिळाले. ए सीरीजमध्ये 540826 आणि बी सीरीजमध्ये 480960 हा तिकीट क्रमांक असलेले विजयी झाले. तर या लॉटरीत इतर विविधही पुरस्कार ठेवण्यात आले होते.
पंजाब राज्य दिवाळी बंपर लॉटरी 2024 मध्ये एकूण 20 लाख तिकिटे जारी करण्यात आली होती. दोन मालिका (A आणि B) मध्ये ही तिकीटे विभागण्यात आली होती. प्रत्येक तिकिटाची किंमत 500 रुपये होती. सर्व तिकिटांना 000000 ते 999999 पर्यंत क्रमांक दिले होते. सहभागींना समान संधी मिळेल हा यामागचा हेतू होता. लॉटरीच्या या वैशिष्ट्यामुळे देशभरातील लोक त्यात सहभागी झाले होते.