दोन मुलांच्या आईला व्हायचंय पोलीस, करतेय कठोर मेहनत, प्रेरणादायी कहाणी

Last Updated:

police bharati inspiring news - प्रतिभा कुमारी असे या महिलेचे नाव आहे. बिहार पोलीस दलात सामील होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्या सहरसा विमानतळ परिसरात धावण्याचा सराव करतात.

प्रतिभा कुमारी
प्रतिभा कुमारी
मोहम्मद सर्फराज, प्रतिनिधी
सहरसा - पोलीस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तसेच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण प्रचंड मेहनत घेतात आणि त्यात यश मिळवतात. पण अनेकांना विशेषत: तरुणींना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण काही महिला अशा असतात, ज्या लग्नानंतरही पोलीस होण्यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत घेतात. अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहेत.
advertisement
ही महिला पोलीस होण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. प्रतिभा कुमारी असे या महिलेचे नाव आहे. बिहार पोलीस दलात सामील होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्या सहरसा विमानतळ परिसरात धावण्याचा सराव करतात. आपले कुटुंब आणि स्वप्न याचा समतोल राख ही महिला प्रचंड मेहनत घेत आहे. प्रतिभा कुमारी यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला.
advertisement
यावेळी त्यांनी सांगितले की, त्या बिहार पोलीसमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. त्या मैदानात दरोज 1 तास धावतात आणि शारीरिक तयारीसाठी कठोर मेहनत घेत आहे. त्या दररोज 5 किलोमीटर धावतात. त्यांचे लग्न झाले असून त्यांची दोन मुलेही आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. तसेच त्यांच्या पतीचाही त्यांना पूर्ण पाठिंबा मिळत असून पोलीस बनण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
advertisement
याचप्रकारे बिहार पोलीसमध्ये सहभागी होण्याची तयारी करत असलेल्या गुडिया कुमारीने सांगितले की, तिने बिहार पोलीसमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाचे नाव कमवावे, असे तिच्या वडिलांचे स्वप्न आहे. बालपणापासून तिला वर्दीचे आकर्षण आहे. त्यामुळे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवसरात्र मेहनत घेत आहे.
मराठी बातम्या/Viral/
दोन मुलांच्या आईला व्हायचंय पोलीस, करतेय कठोर मेहनत, प्रेरणादायी कहाणी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement