ट्रेन सुटल्यामुळे एकतर वेळेवर पोहचता येत नाही, शिवाय तिकिटीचेही पैसे वाया जातात. अनेक लोकांसोबत असा प्रकार नक्कीच घडला असेल. परंतू त्यांपैकी अनेकांना हे माहित नाही की आपली ट्रेन सुटली तरी आपल्याला तिकिटाचे पैसे परत मिळतात.
आता हे पैसे कसे परत मिळवायचे आणि कोणत्या परिस्थितीत पैसे परत मिळतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्यासोबत असं घडलं तर काय करायला हवं? हे तुम्हाला कळेल.
advertisement
तुमची ट्रेन चुकल्यास, तुम्हाला तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी ट्रेन सुटल्याच्या 1 तासाच्या आत TDR दाखल करावा लागेल.
टीडीआर ही रेल्वे प्रवाशांना दिलेली सुविधा आहे. ज्याद्वारे प्रवासी तिकिटाचे पैसे काढू शकतात. तिकीट ठेव पावती असं त्याचं फूलफॉर्म आहे.
TDR दाखल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या तिकिटाचे पैसे 60 दिवसांच्या आत परत मिळतील.
कन्फर्म तिकिटांवरच प्रवासी टीडीआर दाखल करू शकतात. TDR दाखल करण्यापूर्वी अटी आणि शर्ती वाचा.