TRENDING:

Shocking! नवरी होताच मृत्यूनं गाठलं! लग्नानंतर 18 तासांतच महिलेचा गेला जीव; धक्कादायक कारण

Last Updated:

महिला जीवनमृत्यूशी झुंज देत होती त्याच अवस्थेत तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. आनंदाचा असा दिवस. पण याच दिवशी एका महिलेसोबत मात्र धक्कादायक घडलं. लग्न केल्यानंतर 18 तासांनी तिचा मृत्यू झाला आहे. या प्रेमीयुगुलाची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जी पाहिल्यावर, वाचल्यावर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

सोशल मीडियावर एका प्रेमीयुगलाची प्रेमकहाणी समोर आली आहे. जी वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. अमेरिकेतील केनक्टिकट राज्यात एका आजारी महिलेनं हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच तिच्या प्रियकराशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोघांचं हॉस्पिटलमध्ये लग्नही झालं, पण लग्नानंतर अवघ्या 18 तासांत संबंधित महिलेचा मृत्यू झाला. या प्रेमी युगुलाची प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संबंधित महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच तिनं तिच्या प्रियकराशी लग्न केलं.

advertisement

viral : आजीने काय खुर्ची सोडली नाय अन् शेवटी पोराचा तलाकच झाला, असं काय घडलं 'निकाह'मध्ये?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही प्रेमकहाणी @PicturesFoIder (आधीचं non aesthetic things) या अकाउंटवरून शेअर करण्यात आलीय. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'संबंधित महिलेचा कॅन्सरने मृत्यू होण्याच्या काही तास आधी तिचा हॉस्पिटलमध्येच विवाह झाला होता.' 29 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजता ही पोस्ट शेअर करण्यात आल्यानंतर ती वेगानं व्हायरल झाली. आतापर्यंत 90 लाख लोकांनी ही पोस्ट पाहिली असून, 76 हजारांहून अधिक लोकांनी ती लाईक केलीय. पोस्टवर एक हजारापेक्षा जास्त कमेंट्स आल्या असून, 2700 पेक्षा अधिकवेळा ती रिट्विट् करण्यात आलीय.

advertisement

या पोस्टवर कमेंट करताना नॉलेज लॅबच्या अध्यक्षा अनिता शर्मा यांनी लिहिलं आहे की, ‘ही घटना खूप दु:खद असून, हे एक परफेक्ट कपल होतं.’ रिचक्वॅक नावाच्या युजरनं लिहिलं आहे की, ‘जीवनातील कठीण आव्हानांना तोंड देताना इतकं प्रेम आणि वचनबद्धता पाहणं हृदयद्रावक आणि प्रेरणादायी आहे.’ तर, आणखी एका युजरनं कमेंट केली आहे की, ‘ही गोष्ट एकाच वेळी आश्चर्यकारक आणि खूप दुःखदसुद्धा होती. तिला तिच्या आयुष्यातील शेवटचे काही तास आनंदात घालवण्याची ही सुंदर संधी मिळाली.’

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

सोशल मीडियावर सध्या ही पोस्ट व्हायरल होत असली तरी ही घटना 22 डिसेंबर 2017 ची आहे. हीदर मोशर असं या मृत महिलेचं नाव होतं. 22 डिसेंबर 2017 ला ऑक्सिजन मास्क घातलेल्या हीदर मोशरनं हार्टफोर्ड हॉस्पिटलमध्ये वेडिंग गाऊनमध्ये हॉस्पिटलच्या बेडवरच डेव्हिडशी लग्न केलं होतं. पण लग्नाच्या 18 तासांनंतर 31 वर्षीय हीदरचा मृत्यू झाला होता. या दोघांची पहिली भेट 2015 मध्ये एका स्विंग डान्सिंग क्लासमध्ये झाली होती. दोघंही पहिल्याच भेटीत प्रेमात पडले. डेव्हिडनं सांगितलं होतं की, ‘23 डिसेंबर 2016 रोजी तो हीदरला प्रपोज करणार होता. पण त्याला समजलं ती कॅन्सरग्रस्त आहे.’ मात्र तरीही डेव्हिडने तिला लग्नासाठी प्रपोज केलं आणि लग्नही केलं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Shocking! नवरी होताच मृत्यूनं गाठलं! लग्नानंतर 18 तासांतच महिलेचा गेला जीव; धक्कादायक कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल