TRENDING:

चिकन, मटण नाही तर पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट खायला आवडतं, अजूनही जिवंत आहे का नरभक्षक माणूस

Last Updated:

Man Eat Private Part : त्याने बर्न्ड नावाच्या माणसाला त्याच्या घरी बोलावलं आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. हे करताना बर्न्ड जिवंत होता तो वेदनेने ओरडत होता. आर्मिनने बर्न्डचं कापलेलं गुप्तांग खाल्लं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : असे कित्येक लोक आहेत ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं. माणसांनी नॉनव्हेज खाणं म्हटलं की मासे, चिकन, मटण आलं. म्हणजे हे प्राण्यांचं मांस. पण तुम्ही कधी माणसांचं मांस खाणाऱ्या माणसाबाबत ऐकलं आहे का? ऐकलं, पाहिलं असेल तरी फिल्ममध्ये. पण प्रत्यक्षातही असा नरभक्षक माणूस आहे. एक असा पुरुष ज्याला पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट खायला आवडतं. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण हा नरभक्षक पुरुष अजूनही जिवंत आहे.
News18
News18
advertisement

जर्मनीतील रोटेनबर्ग इथं राहणारा एक सामान्य कॉप्युटर टेक्निशियन आर्मिन मेईवेस. त्याने एका पुरूषासोबत असं काही केले जे करण्यापूर्वी एक राक्षसही 4 वेळा विचार करेल. 2001 मध्ये त्याने बर्न्ड नावाच्या माणसाला त्याच्या घरी बोलावलं आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. हे करताना बर्न्ड जिवंत होता तो वेदनेने ओरडत होता. आर्मिनने बर्न्डचं कापलेलं गुप्तांग खाल्लं. इतकंच नाही तर आर्मिनने बर्न्ड जिवंत असताना त्याच्या पाठीवरून मांसाचा तुकडाही काढला. नंतर त्याने त्याचा आवडता डिनर सेट बाहेर काढला, मेणबत्त्या पेटवल्या आणि टेबल सजवलं. त्याने मांस तळलं आणि प्रिन्सेस पोटॅटो, स्प्राउट्ससह वाढलं.

advertisement

एका मुलाखतीत आर्मिनने म्हटलं होतं की, 'हे मांस डुकराच्या मांसासारखं लागत होतं. पण ते खूपच चांगलं होतं.' खाल्ल्यानंतर आर्मिनने बर्न्डला बाथटबमध्ये झोपवलं आणि शेवटी त्याच्या मानेवर वार करत त्याला संपवून टाकलं.

नवराही सोडवेना अन् बॉयफ्रेंडही... महिलेची पंचायतीमध्ये खतरनाक मागणी, अख्खं गाव धक्क्यात!

बर्न्डचा मृत्यू झाला पण तरी त्याच्या आर्मिनच्या तावडीतून सुटका झाली असं नाही. आर्मिनने बर्न्डच्या शरीराचे तुकडे केले. त्याने शरीराचे काही भाग बागेत पुरले आणि उर्वरित मांस फ्रीजरमध्ये ठेवलं. पुढील 10 महिने तो हे मांस हळूहळू खात राहिला. प्रत्येक वेळी तो हे मांस वेगवेगळ्या प्रकारे शिजवत असे, कधी सॉसमध्ये, कधी ग्रिलमध्ये आणि कधी इतर कोणत्याही प्रकारे.

advertisement

पण हे रहस्य जास्त काळ लपून राहू शकलं नाही. या राक्षसाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला. जो त्याने काही दिवसांनी एका वेबसाइटवर अपलोड केला. या घटनेच्या काही महिन्यांनंतर 2002 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली.

एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, त्याच्या आईच्या निधनानंतर त्याला माणसं खाण्याची स्वप्ने पडायची. त्यानंतर तो हे सर्व करू लागला. त्याने सांगितलं की त्याने अनेक लोकांना मारलं आहे. त्याने कॅमेऱ्यासमोर कबूल केलं की तो लोकांना मारायचा आणि त्यांचं मांस फ्रीजरमध्ये ठेवायचा. आणि तो ते कित्येक महिने खात असे. तो स्वतःला मास्टर बुचर म्हणवून घेत असे. आर्मिनने न्यायालयात आपली बाजू मांडली. तो म्हणाला, 'बर्न्ड स्वतःच्या इच्छेने आला.'

advertisement

OMG! प्रेग्नंट महिलेला पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले, नवरा-बायकोसमोर 'हातच जोडले', पण का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

जानेवारी 2004 मध्ये आर्मिनला मनुष्यवधाचा दोषी ठरवण्यात आला आणि 8 वर्षे 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. पण 2006 मध्ये पुन्हा खटला चालवण्यात आला आणि त्याला हत्येचा दोषी ठरवण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आज वयाच्या 63 व्या वर्षी आर्मिन तुरुंगात आहे आणि त्याची कहाणी जगभर धडा म्हणून सांगितली जाते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
चिकन, मटण नाही तर पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट खायला आवडतं, अजूनही जिवंत आहे का नरभक्षक माणूस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल