OMG! प्रेग्नंट महिलेला पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले, नवरा-बायकोसमोर 'हातच जोडले', पण का?

Last Updated:

Pregnancy News : बुधवारी झारडोलच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात तिची डिलीव्हरी झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. मूल तसं सामान्यच. तरीही या प्रेग्नन्सीची चर्चा सर्वत्र होते आहे.

News18
News18
जयपूर : प्रेग्नन्सी म्हणजे डॉक्टरांसाठी काही नवीन नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक प्रेग्नंट महिला जिला पाहून डॉक्टर आश्चर्यचकीत झाले आहेत. हे वाचून तुम्हालाही नवल वाटलं आहे. तुम्ही म्हणाल डॉक्टरांना आश्चर्य वाटण्यासारखं यात नवल काय आहे? राजस्थानातील हे प्रेग्नन्सीचं प्रकरण चर्चेचा विषय ठरलं आहे.
राजस्थानमधील उदयपूर येथील आदिवासी भाग असलेल्या झारडोलमधून हे प्रकरण. एक महिला प्रेग्नंट झाली. रेखा कालबेलिया असं या महिलेचं नाव. बुधवारी झारडोलच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात तिची डिलीव्हरी झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. मूल तसं सामान्यच. तरीही या प्रेग्नन्सीची चर्चा सर्वत्र होते आहे. याचं कारण म्हणजे ही महिला 55 वर्षांची आहे आणि तिचं नुकतंच जन्माला बाळ तिचं सतरावं मूल आहे.
advertisement
काय वाचूनच तुम्हाला धक्का बसला ना? झाडोल कम्युनिटी हेल्थ सेंटरचे स्त्रीरोगतज्ज्ञ रोशन दरंगी म्हणाले की, जेव्हा रेखाला दाखल करण्यात आलं तेव्हा कुटुंबाने सांगितलं की त्यांचं चौथे अपत्य आहे. नंतर कळलं की हे त्यांचं सतरावं अपत्य आहे.
रेखाची आधीच 16 मुलं, ज्यापैकी 5 जणांचं लग्न झालं आहे. तर 4 मुलं आणि एका मुलीचा जन्म झाल्यानंतर काही वेळातच मृत्यू झाला होता.
advertisement
रेखाचा नवरा कवारा कालबेलिया म्हणतात की त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही आणि ते मुश्किलने उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या मुलांना उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना सावकारांकडून 20% व्याजदराने पैसे घ्यावे लागत होते. त्यांनी आतापर्यंत लाखो रुपये भरले आहेत, पण व्याज पूर्ण भरलेलं नाही.
advertisement
वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने वर्षांपूर्वी 'हम दो हमारे दो'चा नारा दिला होता. आरोग्य विभाग दरवर्षी जनतेला याबद्दल जागरूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो. पण राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील आदिवासी भागातील झाडोल सामुदायिक आरोग्य केंद्राचं हे चित्र सर्वांनाच आश्चर्यचकित करतं. आता रेखा आणि तिच्या पतीला नसबंदीबद्दल जागरूक केलं जाईल. जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती टाळता येतील.
view comments
मराठी बातम्या/Viral/
OMG! प्रेग्नंट महिलेला पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले, नवरा-बायकोसमोर 'हातच जोडले', पण का?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement