TRENDING:

निष्काळजीपणा भोवला! शेतातील आग वनक्षेत्रात, शेतकऱ्याला 100 झाडे लावण्याची शिक्षा!

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथे एका शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतात लावलेली आग वनक्षेत्रात पसरली. या प्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्याला...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ढेबेवाडी (सातारा) : शेताच्या बांधावर लावलेली आग निष्काळजीपणामुळे वनक्षेत्रात पसरल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी घारेवाडीतील एका शेतकऱ्याला धडा शिकवला आहे. या प्रकरणात न्यायालयाने शेतकऱ्याला दोषी ठरवत 3 हजार रुपयांचा दंड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिथे आग लागली त्या वनविभागाच्या हद्दीत 100 झाडे लावण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. या महत्वपूर्ण निकालामुळे पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांना एक मोठा आणि स्पष्ट संदेश मिळाला आहे.
Satara News
Satara News
advertisement

4 महिन्यांपूर्वी घडली होती घटना

हे प्रकरण 23 मार्च 2025 रोजी घडले होते. घारेवाडीतील संबंधित शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधाला आग लावली होती. मात्र, ही आग इतरत्र पसरू नये यासाठी कोणतीही पुरेशी खबरदारी घेतली नाही. परिणामी, ही आग वेगाने जवळच असलेल्या वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक 704 मध्ये पसरली. या आगीमुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बराच भाग जळून खाक झाला होता.

advertisement

न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावली अनोखी शिक्षा

या घटनेनंतर, वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेऊन वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर झाली. न्यायालयाने सर्व बाजू तपासून शेतकऱ्याला दोषी ठरवले आणि त्याला 3 हजार रुपयांचा दंड तसेच 100 झाडे लावण्याची शिक्षा ठोठावली.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर, कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळे वनपाल कांबळे, वनरक्षक अभिजित सावंत, संतोष पाटील आणि अरुण शिबे यांनी संबंधित शेतकऱ्याकडून वनक्षेत्रात 100 वृक्षांची लागवड करून घेतली. या शिक्षेमुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि पर्यावरणाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे लोकांना समजू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

हे ही वाचा : आधी प्रेम, मग अत्याचार! 'या' मुलीला इन्स्टाग्रामवरचं प्रेम पडलं महागात; मुलगा म्हणतोय, "जिवंत सोडणार नाही"

हे ही वाचा : धक्कादायक! पाणी समजून तणनाशक प्यायला, 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

मराठी बातम्या/Viral/
निष्काळजीपणा भोवला! शेतातील आग वनक्षेत्रात, शेतकऱ्याला 100 झाडे लावण्याची शिक्षा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल