धक्कादायक! पाणी समजून तणनाशक प्यायला, 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Last Updated:

गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील 21 वर्षीय प्रशांत विश्वनाथ कोरीचा पाणी समजून पाण्याच्या बाटलीत ठेवलेले तणनाशक प्राशन केल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी...

Gadhinglaj accidental death
Gadhinglaj accidental death
गडहिंग्लज : पिण्याचे पाणी समजून पाण्याच्या बाटलीत ठेवलेले तणनाशक प्राशन केल्याने एका 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशांत विश्वनाथ कोरी (वय-21, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे या मृताचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे गडहिंग्लज परिसरात आणि पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव येथील विश्वनाथ बाबूराव कोरी यांचा मुलगा प्रशांत याने 'आयटीआय'ची पदविका पूर्ण केली होती. पदवी मिळाल्यानंतर त्याने काही काळ पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर तो अलीकडेच संकेश्वर येथील एका साखर कारखान्यात कामाला लागला होता. त्याचे आयुष्य नुकतेच मार्गावर येत होते.
advertisement
दरम्यान, मंगळवारी (दि. 29) प्रशांतने घरातील पाण्याच्या बाटलीत ठेवलेले किडीवर मारण्याचे औषध (तणनाशक) पाणी समजून प्राशन केले. ही गंभीर चूक त्याच्या जीवावर बेतली. तणनाशक पोटात गेल्याने त्याची प्रकृती अत्यंत खालावली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान प्रशांतची प्राणज्योत मालवली.
प्रशांतच्या पश्चात त्याचे आई, वडील, आजोबा आणि भाऊ असा परिवार आहे. तरुण मुलाच्या अशा अचानक आणि दुर्दैवी निधनाने कोरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडील विश्वनाथ कोरी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. एका क्षणाच्या चुकीने एका उमद्या तरुणाचा जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
मराठी बातम्या/कोल्हापूर/
धक्कादायक! पाणी समजून तणनाशक प्यायला, 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement