या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की सर्कस दरम्यान कलाकाराची अचानक पकड सुटली आणि ती खाली पडली. यानंतर लोकांचा श्वास थांबला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ही घटना 24 ऑगस्ट रोजी पोर्टलँडमधील पोर्टलँड एक्सपोझिशन सेंटर येथे Cirque du Soleil शो “Cooza” च्या थेट कामगिरीदरम्यान घडली. सर्कसमध्ये कलाकार स्टंट करत असताना एरियल हूप आर्टिस्टची पकड सैल झाली आणि ती जमिनीवर पडली. खाली जाळी नसल्याने आर्टीस्ट गंभीर जखमी झाली आहे. सर्कसमध्ये स्टंट करताना अनेकदा सुरक्षा जाळ्या लावल्या जातात. पण यावेळी मात्र ही जाळी नव्हती.
advertisement
मारिया कॉनफेक्टोवा नावाची कलाकार हवेत रिंगवर स्टंट करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अचानक तिच्या हातातून रिंग निसटली आणि ती कित्येक फूट उंचीवरून थेट जमिनीवर पडली. जमिनीवर पडल्यानंतर कलाकार तिथेच पडून रहाते, तिच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ इथे संपला. वृत्तानुसार, कलाकाराला ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
सर्कसमध्ये उपस्थित प्रेक्षकांना हा शोचाच एक भाग वाटत होता. परंतू तो एक अपघात होता, हे तेथील लोकांना खूप उशीराने कळले.