आता कुठे कोरोना पूर्णपणे गेला असं समजत भारतीय सुटकेचा श्वास घेत होते, पण पुन्हा एकदा कोरोनाची भीती उद्भवली आहे.
कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव आढळला आहे.
सकाळी-सकाळी एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता, अचानकपणे तिची तब्येत ढासळली आणि काही तासांत तिला डॉक्टरांनी मृत घोषीक केलं. त्याचवेळी एका तरुणाला ताप, खोकला, आणि थकवा जाणवू लागतो. त्याला तातडीने तपासणीसाठी रुग्णालयात नेलं जातं आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, म्हणजेज तो कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.
advertisement
पुन्हा एकदा या विषाणूने आपली आठवण करून दिलीय. दोन्ही रुग्णांची माहिती मिळताच आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. संबंधित रुग्णांचे संपर्क तपासले जात आहेत, आणि त्यांच्या सॅम्पल घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर शहरात समोर आली आहे. सध्या मृत झालेली महिला मूळची इंदूरची असून तिला किडनीशी संबंधित गंभीर आजार होता आणि मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे तिचा मृत्यू झाला. दुसरा रुग्ण देवास येथील असून त्याला अरबिंदो मेडिकल कॉलेजमध्ये आइसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. इंदूरच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून सर्व खबरदारी घेतली असून नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.