इंस्टाग्रामवर @therealtarzann या अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात माईक होल्स्टन नावाचा युवक एका मोठ्या मगरीच्या पाठीमागून जाऊन तिची शेपटी ओढण्याचा प्रयत्न करतो. मात्र शेपटी ओढताच मगर क्षणात पलटते आणि माईकवर जबरदस्त हल्ला करते.
त्याचं नशिब चांगल असतं आणि त्याच्या प्रसंगावधानामुळे काही इंचांच्या फरकाने तो स्वतःचा जीव वाचवतो. पण जर त्याने एक क्षण जरी उशीर केला असता, तर हा स्टंट त्याच्या जीवावरही बेतू शकला असता.
advertisement
या व्हिडीओवर लाखो व्यूज आले असून, नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हे कृत्य ‘मूर्खपणा’ ठरवलं आहे. काहींनी म्हटलं,"ही शूरता नाही, तर अतीशय वेडेपणा आहे." एकाने तर गंमतीत लिहिलं, "मगरमच्छ म्हणाला, आज मूड नाही रे भाऊ."
लोक व्हायरल होण्यासाठी इतके वेडे झाले आहेत की ते स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाहीत? खतरनाक प्राणी, उंचीवरचे स्टंट्स, धोकादायक कृत्यं, हे सर्व फक्त पाहण्यापुरते असावेत. प्राण्यांची खिल्ली उडवणं किंवा त्यांना चिडवणं, ही ‘करामत’ नसून जबाबदारीशून्यता आहे.