साप आणि मुंगूसाच्या फायटिंगचे व्हिडीओ तसे व्हायरल होतच असतात. पण सध्या व्हायरल होत असलेला त्यांच्या फायटिंगचा व्हिडीओ खूप खास आहे याचं कारण म्हणजे त्यांच्या भांडणात आलेला तिसरा. हा तिसरा आहे तो चक्क कावळा. साप आणि मुंगूसाची फायटिंग सुरू असताना मधेच कावळा आला आहे, त्यानंतर जे घडलं ते आश्चर्यकारक आहे. आता साप आणि मुंगूसाच्या लढाईत कावळ्याची एंट्री झाली तर नेमकं काय झालं ते पाहुयात.
advertisement
40 दिवसांत एकाच व्यक्तीला 13 वेळा चावला साप, खरंच असं होऊ शकतं का? विज्ञान काय सांगतं?
व्हिडिओमध्ये एक साप आणि मुंगूस एकमेकांशी लढाई करातना दिसत आहेत. तितक्यात एक कावळा तिथं येतो. कावळा सापाभोवती फिरताना दिसतो. ज्यामुळे सापाचं लक्ष मुंगूसावरील लढाईपासून विचलित होतं. साप पूर्णपणे कावळ्याकडे लक्ष केंद्रीत करतो. कावळाही त्याचं लक्ष आपल्याकडेच वेधण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ पाहून असं दिसतं की कावळा सापाला विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून मुंगूस त्याला मारू शकेल आणि तेच होतं. साप कावळ्याकडे पाहत राहतो आणि मागून मुंगूस येऊन सापाला तोंडात धरून खेचत झुडुपात घेऊन जातो.
@NaeemAh78347923 एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून असं दिसतं की कावळा इतका हुशार आहे की त्याने मुंगूसाला लढाईत मदत केली.
साप आणि मुंगूस एकमेकांचे शत्रू का?
प्राणीशास्त्रज्ञ म्हणतात की साप आणि मुंगूस यांच्या लढाईचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या अन्नसाखळीतील स्पर्धा. मुंगूस हा एक लहान पण अत्यंत चपळ आणि सावध शिकारी आहे. त्याला साप खाण्यात, विशेषतः विषारी साप खाण्यात विशेष रस आहे. दुसरीकडे साप हे जंगलातील सर्वात मोठे भक्षक आहेत, ते उंदीर, बेडूक, सरडे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. म्हणून जेव्हा मुंगूस सापावर हल्ला करतो तेव्हा त्यांना तोंड द्यावं लागतं. साप आणि मुंगूस यांच्यातील स्पर्धा ही निसर्गचक्राचा एक भाग आहे, जिथं दोन्ही प्राणी जगण्यासाठी संघर्ष करतात.
मुंगूसावर सापाच्या विषाचा परिणाम का होत नाही?
मुंगूसमध्ये एक विशेष प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती असते जी त्याला सापाच्या विषापासून वाचवते. वैज्ञानिक अभ्यासानुसार, मुंगूसाच्या शरीरात एसिटाइलकोलीन रिसेप्टर्स असतात, जे सापाच्या विषाला प्रभावीपणे निष्क्रिय करतात. म्हणूनच, कोब्रासारख्या विषारी सापाने चावल्यानंतरही, मुंगूस अनेकदा जिवंत राहतो. म्हणूनच मुंगूस सापाला घाबरत नाही, उलट थेट त्याच्यावर हल्ला करतो.
झोपलेल्या महिलेला चावला साप, पोटात वेदना, हॉस्पिटलमध्ये नेताच जन्माला आलं बाळ
साप विषारी आणि शक्तिशाली असला तरी, मुंगूस त्याच्या चपळाई आणि धूर्ततेसाठी प्रसिद्ध आहे. मुंगूस सापाच्या हल्ल्यापासून मोठ्या वेगाने आणि प्रतिहल्ला करून वाचू शकतात. मुंगूस सामान्यतः सापाच्या डोक्यावर हल्ला करून त्याला शक्य तितक्या लवकर मारतो.
साप आणि मुंगूसाच्या लढाईत कोण बाजी मारतं?
साप आणि मुंगूस यांच्यातील या संघर्षात दोघंही एकमेकांना आव्हान देतात. साप आपल्या विषाने मारण्याचा प्रयत्न करतो, तर मुंगूस आपल्या तीक्ष्ण दातांनी सापाला हरवण्याचा प्रयत्न करतो. ही लढाई पाहणं अत्यंत रोमांचक आहे, कारण सापाच्या शांत हालचाली मुंगूसाच्या विजेच्या वेगाने होणाऱ्या वेगाविरुद्ध आहेत. म्हणूनच ही स्पर्धा निसर्गाचं उल्लेखनीय संतुलन मानली जाते.
बहुतेक प्रकरणांमध्ये, मुंगूस सापावर मात करतो. हे प्रामुख्याने मुंगूसची चपळता, धूर्तता आणि त्याच्या विषाविरुद्ध प्रतिकारशक्तीमुळे होते. पण याचा अर्थ असा नाही की साप नेहमीच हरतो. जर साप मोठा असेल किंवा मुंगूस संधी गमावतो, तर परिस्थिती बदलू शकते. विशेषतः मोठे अजगर, मुंगूसभोवती स्वतःला गुंडाळून मारू शकतात.