TRENDING:

पती हजारोवेळा पत्नीच्या शरीरावर गोंदवतो 'हे' एकच नाव; भारतातील या अनोख्या जमातीबद्दल माहितीये का?

Last Updated:

आज आम्ही तुम्हाला मध्य भारतात राहणाऱ्या एका सिक्रेट जमातीबद्दल सांगणार आहोत. या जमातीतील लोकांनी आपलं जीवन भगवान रामाला समर्पित केलं आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली 17 नोव्हेंबर : जगात अनेक प्रकारच्या जमाती राहतात. लोकांना अनेक जमातींबद्दल तर माहितीही नाही. या जमाती घनदाट जंगलात लपून राहतात. जगाच्या आधुनिकतेशी त्यांचा काही संबंध नाही. ते इतर लोकांच्यात न राहता एकटे राहतात. पण काही जमातींनी काळासोबत आपली जीवनशैली बदलली आहे. त्यांनी काळाबरोबर स्वतःमध्ये बदल घडवून आणले, परिणामी जगाला त्यांच्या जीवनाची माहिती झाली.
भारतातील अनोखी जमात
भारतातील अनोखी जमात
advertisement

भारतातही अनेक जमातींचे लोक राहतात. आज आम्ही तुम्हाला मध्य भारतात राहणाऱ्या एका सिक्रेट जमातीबद्दल सांगणार आहोत. या जमातीतील लोकांनी आपलं जीवन भगवान रामाला समर्पित केलं आहे. त्यांच्या शरीरावर रामाच्या नावाचे टॅटू आहेत. एक्सप्लोरर आणि व्हिडिओग्राफर ड्र्यू बिन्स्की यांनी या जमातीचं जीवन जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला. रामनामी समाजाचे फोटो काढून त्यांनी जगाला त्यांची ओळख करून दिली.

advertisement

इंटरनेटमुळं गेला असता जीव; पोटदुखीचं कारण शोधताना असं काही वाचलं की या व्यक्तीनं घेतला जीव देण्याचा निर्णय

या जमातीत फार कमी रामनामी शिल्लक आहेत. या जमातीत फक्त वीस ते तीस लोक उरले आहेत, ज्यांच्या संपूर्ण अंगावर राम नावाचा टॅटू आहे. हे लोक मोराच्या पिसांचा मुकुट घालतात. ते दिवसभर राम नामाचा जप करत असतात. टॅटू काढण्यात आता जमातीतील तरुण कचरत असल्याचं वयोवृद्ध रामनामी सांगतात.

advertisement

संपूर्ण शरीरावर गोंदवतात रामाचं नाव

ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे ते हे करत नाहीत. अशा स्थितीत त्यांच्यानंतर ही प्रथा संपुष्टात येईल, अशी भीती या लोकांना वाटते. एका रामनामीने सांगितलं, की ती 90 वर्षांची आहे. मृत्यूपूर्वी तिच्या पतीने तिच्या शरीरावर हजारहून अधिक वेळा रामाचं नाव लिहिलं होतं. पण आता अशी माणसं फार कमी उरली आहेत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
पती हजारोवेळा पत्नीच्या शरीरावर गोंदवतो 'हे' एकच नाव; भारतातील या अनोख्या जमातीबद्दल माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल