इंटरनेटमुळं गेला असता जीव; पोटदुखीचं कारण शोधताना असं काही वाचलं की या व्यक्तीनं घेतला जीव देण्याचा निर्णय

Last Updated:

आजकाल, लोक इंटरनेटवर अगदी लहान गोष्टी शोधतात आणि काही लोक ऑनलाइन वाचलेल्या माहितीलाच खरं समजतात. तुम्ही त्यावरच विश्वास ठेवता आणि टेन्शन वाढवता. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं आहे. त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
आजकाल, लोक इंटरनेटवर अगदी लहान गोष्टी शोधतात आणि काही लोक ऑनलाइन वाचलेल्या माहितीलाच खरं समजतात. विशेषत: जर तुम्हाला कुठली शारीरिक समस्या झाली तर तुम्ही इंटरनेटवर त्याबद्दल माहिती शोधताच. तेव्हा तुम्हाला काही साधं सुधी समस्या झाली असेल तरी तुम्हाला काहीतरी खुप गंभीर झाल्याची माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही त्यावरच विश्वास ठेवता आणि टेन्शन वाढवता. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं आहे. त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
नुकताच रोमानियातील एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला. तो पोटदुखीची तक्रार करत होता. डॉक्टरांकडे गेल्याने ही समस्या दूर होईल, असा विचार त्या व्यक्तीने केला होता. दरम्यान, त्याने इंटरनेटवर आपल्या समस्येबद्दल शोध सुरू केला. त्याने केलेली चूक अशी होती की त्याने ऑनलाइन संशोधनात जे सत्य आढळले तेच त्याने स्वीकारले आणि त्याने जे भयंकर पाऊल उचलले ते कोणाच्याही कल्पनेपलीकडचे होते.
advertisement
बापरे! फटाके फोडतानाचा VIDEO पाहून पोलिसांनाही धडकी; तब्बल 13 मुलांना अटक
रोमानियातील बोटोसानी नावाच्या शहरात राहणार्‍या या व्यक्तीला कोलनच्या दुखण्याने त्रास होत होता, त्यामुळे तो खूप उदास वाटत होता. बायकोला त्याची उदासीनता दिसत होती. एके दिवशी तो लाकूड आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला आणि बायकोला निरोप दिला – मला माफ कर, तू चांगली पत्नी आहेस. त्याच क्षणी त्या महिलेला काहीतरी विचित्र वाटलं आणि ती घराबाहेर पळाली. तेथे त्या व्यक्तीने हातात अँगल ग्राइंडर धरलेले आढळले. त्याने आपले मनगट कापले होते. पत्नीने तातडीने अॅम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटल गाठले. येथे डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरीद्वारे त्याचा हात जोडला. आता हा व्यक्ती सुखरूप आहे.
advertisement
त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितले की त्याला कोल पेन होत होता. त्याच्या लक्षणांवरून त्याला इंटरनेटने कॅन्सर असल्याचं सांगितलं. मग त्याला कॅन्सर असल्याची खात्री पटली. पण त्याने डॉक्टरांकडे जाणं टाळलं. त्याने कधीही कोणत्याही तज्ञांना विचारले नाही, परंतु ऑनलाइन संशोधन केल्यानंतर,त्याने स्वतःला कॅन्सर असल्याचं मान्य केलं. त्यामुळं तो खोल नैराश्यात गेला, त्यानंतर त्याने आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण आता तो सुखरूप बरा आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
इंटरनेटमुळं गेला असता जीव; पोटदुखीचं कारण शोधताना असं काही वाचलं की या व्यक्तीनं घेतला जीव देण्याचा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement