बापरे! फटाके फोडतानाचा VIDEO पाहून पोलिसांनाही धडकी; तब्बल 13 मुलांना अटक

Last Updated:

काही लोक नको त्या पद्धतीने फटाके फोडतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

असे फटाके फोडणं पडलं भारी
असे फटाके फोडणं पडलं भारी
चेन्नई, 16 नोव्हेंबर : दिवाळी म्हटली की फटाके आलेच. पण फटाके फोडतानाही काळजी घ्यायला हवी, ते सावधपूर्वक फोडायला हवेत. पण तरी काही लोक नको त्या पद्धतीने फटाके फोडतात. दिवाळीतील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात मुलांनी अशा पद्धतीने फटाके फोडले आहेत की पोलिसांनाही धडकी भरली आहे. फटाके फोडतानाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर पोलिसांनी तब्बल 13 मुलांना अटक केली आहे. तामिळनाडूतील ही घटना आहे.
तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही मुलं बाईकवर फटाके फोडताना दिसली. बाईकवर फटाके लावून, बाईक एका चाकावर चालवत हवेत फटाके उडवताना ते दिसले. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. पोलिसांनीही तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी बाईकस्वारांची ओळख पटवली आणि या खतरनाक स्टंटमध्ये सहभागी असलेल्या एकूण 13 जणांना अटक केली.
advertisement
जिल्हा पोलीस अधीक्षक व्ही वरुणकुमार यांच्या शिफारशीनुसार, वाहतूक विभागाने त्रिची जिल्ह्यातील धोकादायक बाइक स्टंटमध्ये सहभागी असलेल्या सात लोकांचे ड्रायव्हिंग लायसन्स अपात्र ठरवण्याचे आदेश दिले. चेन्नईतील परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, या सात जणांना कारणे दाखवा नोटीस जारी करेल. त्यांना सात दिवसांत उत्तर द्यावं लागेल. त्यानंतर ते परवाना निलंबित करण्यास पुढे जातील. जिल्हा पोलिसांनी 11 आरोपींचे वाहन परवाने रद्द करण्याची शिफारस केली.
advertisement
हा स्टंट करणाऱ्या एका प्रमुख व्यक्तीला जिल्हा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सिरुमरुधुर येथील ओव्हरब्रिजवर फटाक्यांसह जीव धोक्यात घालून बाइक स्टंट केल्याच्या आरोपाखाली श्रीनिवासपुरम येथील पी मणिकंदनला  समयापुरम पोलिसांनी अटक केली. बाईक स्टंटमध्ये सहभागी असलेल्या 11 जणांना पोलिसांनी अटक केली होती, परंतु मणिकंदनने सोमवारपर्यंत अटक टाळली. एस अजय (24), एम शक्तीवेल (30), ए विजय (18), हे सिरुमारुधुर ओव्हरब्रिजवरील स्टंटसाठी मणिकंदकडे बुक केलेल्या चौघांपैकी होते.
advertisement
अजयला त्रिची इथं बाईक स्टंट केल्याबद्दल सरकारी रुग्णालय पोलिसांनी आधीच अटक केली होती. लालगुडी पोलिसांनी एस अरुल मुरुगन (24) बी कृतिश (20) डी वसंतकुमार (20), पी देसिंगा पेरुमल (18), आणि एम मोहम्मद रियाझदीन (22), यांना सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याबद्दल आणि त्यांच्या बाईक स्टंटमध्ये जीव धोक्यात घालून पाच जणांना अटक केली. कनाकिलियानाल्लूर पोलिसांनी एम अजित (21), आणि पी अजय (20), यांना त्यांच्या बाईक स्टंटसाठी थचनकुरिची इथं अटक केली. यू फरशाद अली (21) याला मुक्कोम्बूजवळ स्टंटबाजी केल्याबद्दल अटक करण्यात आली.
advertisement
दरम्यान असे बाईक स्टंट पाहिल्यावर तक्रार करण्यासाठी  पोलीस विभागाने 9487464651 हा तक्रार क्रमांक देखील जारी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
बापरे! फटाके फोडतानाचा VIDEO पाहून पोलिसांनाही धडकी; तब्बल 13 मुलांना अटक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement