महिंद्राची नवी कोरी थार SUV चा अपघात झाल्यानंतर सगळीकडेच ही बातमी वाऱ्या सारखी पसरली. ज्यामध्ये कारमध्ये बसलेल्या किंवा कार चालवत असलेल्या तरुणीला गंभीर दुखापत झाली, तिची मान तुटली अशा बातम्या समोर आल्या. काही लोकांनी तर असं देखील सांगितलं की या करुणीचा मृत्यू झाला. पण आता त्याच थार अपघातातील तरुणीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती जिवंत असल्याचं सांगत आहे. ही घटना दिल्लीमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
या थार अपघातातील तरुणीबद्दल जेव्हा वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या तेव्हा तिने ती जिवंत असल्याचं सांगण्यासाठी एक व्हिडीओ बनवला, जो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लोकांना कळकळीची विनंती केली आहे की, 'प्लीज कोणीही फॉल्स किंवा चुकीची माहिती पसरवू नका. मी पूर्णपणे बरी आहे, मला काहीही झालेलं नाही. मी माझी फॅमेरी आणि शोरुमचा सेल्समॅन या कारमध्ये बसलो होतो. मला त्यांनी सांगितलं होतं की कारचा आरपीएम जास्त आहे. पण तरी हा अपघात झाला. पण तुम्ही प्लीज माझ्याबद्दल चुकीचं पसरवू नका, मी एकदम ठिक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय महिलेने गाडी हळूहळू पुढे नेण्याऐवजी चुकून जोरात एक्सेलरेटर दाबला. त्यामुळे SUV रेलिंग तोडत शो-रूमच्या काचेतून थेट खाली कोसळली. सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.
गाडीत महिला, तिचं कुटुंब आणि एक सेल्समॅन उपस्थित होते. ते अपघातातून सुखरूप बाहेर आले. महिलेने नंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या बातम्या न पसरवण्याची विनंती केली आहे. महिलेने पुढे सांगितले की, त्या वेळी गाडीचा RPM खूप उच्च होता, त्यामुळे SUV अचानक वेगाने पुढे गेली आणि अपघात झाला.