खरंतर लग्न कार्यात बऱ्याचदा अन्न वाया जातं. पण असं होऊ नये म्हणून एका लग्नात एक आगळी वेगळी शक्कल लावली गेली. जी पाहून तुम्ही नक्कीच कौतुक कराल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत आणि असा प्रकार लग्नात यावा अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, जेवल्यानंतर एक व्यक्ती उरलेल्या अन्नासह थाळी डंपिंग टबमध्ये ठेवण्यासाठी जात आहे. यादरम्यान एक व्यक्ती त्याला थांबवतो आणि समोरच्या स्टॉलकडे इशारा करतो. जिथे टेबलावर अनेक बॉक्स दिसतात, ज्यावर पदार्थांची नावे लिहिलेली असतात आणि उरलेले अन्न त्याच बॉक्समध्ये ठेवण्यासाठी सांगितले जाते. त्यानंतर तेथे जाऊन ती व्यक्ती आपल्या ताटातील पदार्थ समोरील डब्यात काढून ठेवते. ज्यानंतर या व्यक्तीला एक फुल देखील मिळलं.
advertisement
या जमा केलेल्या जेवणाला गरजू लोकांना तसेच प्राण्यांना देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचं नेमकं काय केलं जाणार आहे, हे कळू शकलेलं नाही.
हा व्हिडिओ arey_tubaa नावाच्या अकाऊंटने इन्स्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओ दोन लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आणि ही संख्या वाढतच चालली आहे आणि करोडो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
