आता हेच पाहाना सोशल मीडियावर एका काकांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये या व्यक्तीने अशी युक्ती काढली की जास्त मेहनत न करता त्याला पैसे कमावता येतील. ते ही थोडे थोडके नाही बरं का ही व्यक्ती दिवसाला 5 हजारांपेक्षा जास्त कमावते.
हो तुम्ही बरोबर ऐकलंत, ही व्यक्ती दिवसाला 5 हजारांपेक्षा जास्त कमावत आहे. हे एखाद्या कॉर्पोरेट व्यक्तीच्या पगारापेक्षा ही जास्त आहे.
advertisement
या व्यक्तीचा व्हिडीओ 'अंकल' या नावाने व्हायरल झाला आहे. ज्याला आपण मराठीत काका असं म्हणतो.
खरंतर हे अंकल रस्त्यावरील अनोळखी लोकांची स्तुती करुन पैसे कमावतात. कधीकधी नोकरी गमावणारी आणि समस्यांना तोंड देणारे लोक मोठ्याने रडू लागतात.
अंकल म्हणाली की,जेव्हा मी इतर लोकांना आनंदी पाहतो तेव्हा मलाही आनंद होतो. त्यामुळेच मी हे काम ३ वर्षे सुरू ठेवले आहे.
कमाई किती आहे?
फलक घेऊन रस्त्यावर फिरणारी ही व्यक्ती दररोज ३० हून अधिक लोकांची स्तुती करतात. यामुळे संपूर्ण दिवसाची कमाई 60 डॉलर (सुमारे 5195 रुपये) पर्यंत आहे. या माणसावर जुगारामुळे खूप कर्ज आहे.
वयाच्या १८ व्या वर्षापासूनच त्याला जुगाराचे व्यसन लागले होते, त्यामुळे त्यांच्यावर मोठे कर्ज होते. यानंतर त्यांने आपले वडील गमावले आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्याची परिस्थीती खालावली. पण आता सगळं सुरळीत सुरु आहे. मागच्या तीन वर्षापासून अंकल हे काम करत आहेत आणि त्यांना हे काम आवडू लागलं आहे.
हा व्हिडीओ भारतातील नसुन परदेशातील आहे. जो जगभरात व्हायरल झाला आहे. लोकांना या अंकलची ट्रीक फारच आवडली आहे. लोक त्याच्या युक्तीची स्तुती करत आहेत.