अशाच काही प्रकरणाचे व्हिडीओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यापैकी काही मजेदार आहेत तर काही खूपच धोकादायक. जे पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.
पहिला व्हिडीओ
व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरच रॉकेट पेटवत आहे. रॉकेट एका बाटलीत लावून आकाशाकडे वळवण्याऐवजी त्याला जमिनीवर ठेवून जाळत आहे. ज्यामुळे रॉकेटला आग लावताच तो एका वृद्ध व्यक्तीच्या लुंगीवर जाऊन फुटतो. ज्यामुळे ही व्यक्ती घाबरली आहे. यामुळे त्या व्यक्तीला दुखापत देखील झालेली असू शकते.
advertisement
दुसरा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या बागेत आरामात बसलेली असताना अचानक एक रॉकेट येऊन त्याच्या अंगावर पडतो आणि फुटतो. ज्यानंतर ही व्यक्ती फारच घाबरते आणि तिला घरात घेऊन जातात.
तिसरा व्हिडीओ
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, रस्त्यावर बॉम्ब लावण्यात आले. त्यानंतर अचानक फटाके फुटु लोगले. दरम्यान स्कूटरवरून तीन जण येतात आणि स्फोट होत असलेल्या फटाक्यांवर पडतात. त्यानंतर ते आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळत जाताना दिसले.
चौथा व्हिडीओ
या चौथ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पाळीव कुत्रा घराच्या आत तोंडात पेटता बॉम्ब घेऊन फिरत आहे, बॉम्बमधून सतत ठिणग्या बाहेर पडत आहेत. कुत्र्याने तोंडात बॉम्ब धरला आहे. गंभीर अपघात टाळण्यासाठी एक व्यक्ती कुत्र्याकडे जाते आणि तोंडातला फटाका काढून बाहेर फेकते.
हे व्हिडीओ पाहून सावध व्हा आणि अशा पद्धतीचा मुर्खपण करु नका आणि दुसऱ्यांना करु देऊ नका.