TRENDING:

इडा पिडा टळू दे..! बळीराजाला अनोखी मानवंदना, तब्बल 40 एकरावर साकारलं क्रॉप पेंटिंग

Last Updated:

Diwali: बलिप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजाला अनोखी मानवंदना देण्यात आलीये. याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही घेणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव: ‘इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे’ ही म्हण गेल्या हजारो वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे. आज बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. याच सणाचे औचित्य साधून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे 40 एकरावर बळीराजाचं क्रॉप पेंटिंग साकारण्यात आलंय. तब्बल 40 एकरावर बळीराजाचा पेंटिंग साकारून कलाकार मंगेश निपाणीकर यांनी बळीराजाला अनोखी मानवंदना दिलीय.

advertisement

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर येथील ईटकळ येथे नागनाथ अक्कलकोटे यांचे 40 एकर पडीक जमीन आहे. या जमिनीवर ही कलाकृती साकारण्यात आलीये. त्यासाठी सोयाबीन, मूग, ज्वारी आणि मका अशा पिकांची पेरणी केली. अनेक संकटांवर मात करीत रासायनिक खतांचा वापर न करता ही पिके वाढवली. या पिकांचे क्रॉप कटिंग करून त्यांनी ही कलाकृती साकारली. तब्बल चार ते पाच ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही पडीक जमीन त्यांनी सुपीक केली. त्यासाठी 30 ते 35 जण दररोज दहा तास काम करीत होते, अशी माहिती निपाणीकर यांनी दिली.

advertisement

दिन दिन दिवाळी..! पती-पत्नीच्या अतूट नात्याचा सण दिवाळी पाडवा, पाहा महत्त्व आणि मुहूर्त!

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार

प्रसिद्ध लेखक शरद तांदळे यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. बळीराजा चक्रवर्ती या कादंबरीचे मुखपृष्ठ म्हणून हे पेंटिंग वापरण्यात येणार आहे. हे विश्वविक्रमी बळीराजाची प्रतिमा 40 एकरावर आहे. या अगोदर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये साडे बत्तीस एकरावर साकारलेले क्रॉ पेंटिंग होते. आता हे रेकॉर्ड या बळीराजाच्या या हरीत प्रतिमेने मोडले असून गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद होणार आहे.

advertisement

दरम्यान, आजच्या बदलत्या शेती पद्धतीमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक किटकनाशके तसेच खतांची निर्मिती झाल्याने उत्पादन वाढवण्यासाठी त्यांचा बेसुमार वापर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेती नापीक बनत चालली आहे. हा वाढता धोका लक्षात घेता, आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. याबाबत सर्वसामान्य शेतकऱ्यांत जनजागृती व्हावी, या हेतुने लेखक शरद तांदळे यांच्या संकल्पनेतून मंगेश निपाणीकर यांनी ही कलाकृती साकारली आहे

advertisement

मराठी बातम्या/Viral/
इडा पिडा टळू दे..! बळीराजाला अनोखी मानवंदना, तब्बल 40 एकरावर साकारलं क्रॉप पेंटिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल