पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ऑस्ट्रेलियामध्ये चक्क फुलांवर बंदी केली गेली आहे. हो तुम्ही बरोबर वाचलत. पण असं का? असा प्रश्न देखील तुम्हाला नक्कीच पडला असेल? अनेक देशांत कृषी आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी बायोसिक्युरिटीचे कडक कायदे लागू केलेले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया हा देश यामध्ये सर्वात आघाडीवर आहे.
अलीकडे मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नव्या नायर हिच्यासोबत देखील घडला. त्या ओणम सेलिब्रेशनसाठी मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेल्या होत्या. विक्टोरिया मलयाळी असोसिएशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमानंतर त्या परत येताना मेलबर्न विमानतळावर त्यांच्या हँडबॅगमध्ये अधिकाऱ्यांना चमेलीच्या फुलांचा गजरा आढळला. त्यावेळी त्यांच्यावर नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तब्बल 1.14 लाख रुपये (AUD 1,980) इतका दंड ठोठावण्यात आला.
advertisement
नव्या नायर ने काय सांगितलं?
मेलबर्नमधील एका कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख करताना नव्या नायर म्हणाली, “हा गजरा माझ्या वडिलांनी मला प्रवासात घालायला दिला होता. मी तो नकळत बॅगेत ठेवला. माझ्याकडून चूक झाली, जरी ती जाणीवपूर्वक नव्हती तरी कायदा म्हणजे कायदा.” तिने पुढे सांगितले की हा दंड 28 दिवसांत भरावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियात फूल नेणं का बेकायदेशीर आहे?
ऑस्ट्रेलियात कृषी आणि स्थानिक पर्यावरण टिकवण्यासाठी खूप कडक बायोसिक्युरिटी नियम आहेत. ताजे फुलं, झाडं, बिया, माती इत्यादी वस्तू प्रतिबंधित यादीत मोडतात. कारण त्यांच्यामार्फत कीटक, जंतू किंवा रोग देशात पसरू शकतात. त्यामुळे जरी तो फक्त गजरा असला तरी कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन आहे, ज्याचा दंड आकारला गेला.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये नव्या नायर विमानतळावर शॉपिंग करताना, जेवताना आणि पारंपरिक केरल साडीत चमेलीचा गजरा लावून फिरताना दिसत आहेत.
काय आहे ऑस्ट्रेलियाचा नियम?
ऑस्ट्रेलिया सरकारच्या (studyaustralia.gov.au) संकेतस्थळानुसार, प्रवाशांना देशात लँड करताना इनकमिंग पॅसेंजर अराइवल कार्ड वर काही वस्तूंची माहिती जाहीर करणं बंधनकारक आहे. यात सर्व प्रकारचं अन्न, झाडं, प्राणी-आधारित वस्तू, 10,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सपेक्षा जास्त विदेशी चलन आणि काही औषधं यांचा समावेश आहे. जर कोणी ही माहिती लपवली, तर त्यांच्यावर मोठा दंड आकारला जातो.
नव्या नायर यांनी 2001 मध्ये ‘इष्टम’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर ‘मझथुल्लिक्कुलुक्कम’ आणि ‘कुंजीकोनन’ सारख्या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. दोन दशकांहून अधिक काळाचा प्रवास पूर्ण केलेल्या नव्या आजही मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानल्या जातात.