नाशिकमधील बिबट्या आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. निफाड तालुक्यातील नांदूर माध्यमेश्वर परिसरातील ही घटना आहे. व्हिडीओत दोन कुत्रे आणि एक बिबट्या दिसतो. कदाचित बिबट्याने या कुत्र्यांवर हल्ला केला असेल. पण बिबट्याला कुत्र्याच्या ताकदीचा अंदाज लावला आला नाही. कुत्र्यानं त्याच्यावर जोरदार पलटवार केला.
'पोटात उंदीर घुसला', 14 वर्षीय मुलीसोबत घडला नको तो प्रकार
advertisement
कुत्र्याने बिबट्याचं तोंड आपल्या तोंडात धरून ठेवलं, इतकं घट्ट पकडलं की बिबट्याला हालचाल करणंही कठीण झालं आहे. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता, कुत्रा या बिबट्याला अक्षरश: फरफटत नेत आहे. 300 मीटर तोंडात ओढत खेचत नेलं आहे. गांगुर्डे वस्तीवर हा थरार रंगला आहे.
पाहून तुम्हाला बिचाऱ्या बिबट्याचीच दया येईल. बिबट्याला शक्ती वापरता येत नव्हती पण त्याने युक्ती वापरली. त्याने मृत झाल्याचं नाटक केलं. व्हिडीओतही तुम्ही पाहाल की तो नंतर फार हलताना दिसत नाही आहे. त्याने आपलं शरीर मृतदेहासारखं ताठ केलं आहे. कुत्र्यालाही बिबट्या मृत झाला असंच वाटलं आणि त्याने बिबट्यावरील पकड सैल केली. तशी बिबट्याने संधी साधली आणि त्याने तिथून पळ काढला.
कुत्रे बिबट्यावर हल्ला करतात का?
कुत्र्यांची एक प्रजाती आहे भोटीया, जे खतरनाक शिकारी म्हणून ओळखले जातात. हे कुत्रे प्रामुख्यानं बर्फाच्छेदीत प्रदेशातील डोंगराळ भागात राहतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची रचना ही प्रचंड बलशाली असते. वेळ पडली तर ते वाघाला सुद्धा फाडून टाकू शकतात. अन् त्यामुळे जंगली शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी हिमाचल प्रदेश, काश्मिर, तिबेट वगैरे या भागात राहणारी लोकं आपल्या घरी हे भुटीया कुत्रे पाळतात.