TRENDING:

कुत्र्याचा झाला मृत्यू, विरह सहन होईना, महिलेने खर्च केले 19 लाख अन् पुन्हा जिवंत केला कुत्रा!

Last Updated:

जोकर नावाचा डोबरमन कुत्रा 11 वर्षांचा असताना हृदयविकाराने मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर महिलेला मोठा धक्का बसला आणि तिने क्लोनिंग करण्याचा निर्णय घेतला. वैज्ञानिकांनी त्याच्या त्वचेच्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
असं म्हणतात, एकदा गेलेला जीव परत येत नाही. म्हणूनच आपल्या जवळच्या व्यक्तींच्या जाण्याचा धक्का लोकं कित्येक वर्षं विसरू शकत नाहीत. आजकाल घरात पाळलेले प्राणीसुद्धा कुटुंबातील सदस्यांसारखेच असतात आणि त्यांच्या जाण्यानेही खूप मोठा धक्का बसतो. अशीच एक अनोखी गोष्ट सध्या व्हायरल होत आहे.
Dog Cloning Story
Dog Cloning Story
advertisement

कुत्र्याच्या विरहाने महिला झाली दुःखी

चीनमधील एका महिलेचं तिच्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे त्या कुत्र्याच्या जाण्याचा तिला खूप मोठा धक्का बसला. शांघायमध्ये राहणाऱ्या या महिलेने आपल्या पाळीव कुत्र्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी तब्बल 19 लाख रुपये खर्च केले. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, हे कसं शक्य आहे? चला, जाणून घेऊया या महिलेने हा चमत्कार कसा केला.

advertisement

लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूने बसला धक्का

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, शांघायमधील हांगझोऊ येथे राहणाऱ्या 'शू' नावाच्या महिलेने 2011 मध्ये एक डोबरमन कुत्रा विकत घेतला. तिने त्याचं नाव 'जोकर' ठेवलं आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करायची. ती एकटी राहत असताना, जोकरमुळे तिला सुरक्षित वाटायचं आणि त्यांचं नातं खूप खास होतं. पण, 9 वर्षांचा असताना जोकरच्या मानेला कर्करोग झाला. महिलेने त्याची शस्त्रक्रिया केली, जी जोकरने धैर्याने सहन केली. 11 वर्षांचा झाल्यावर, जोकरला हृदयविकाराचा झटका आला आणि तो मरण पावला. जोकरच्या मृत्यूमुळे महिलेला मोठा धक्का बसला.

advertisement

19 लाख रुपये खर्चून कुत्र्याला पुन्हा जिवंत केलं

पण, महिलेने हार मानली नाही आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार, तिने आपल्या जोकर कुत्र्याच्या क्लोनिंगची प्रक्रिया अवलंबली. तिने क्लोनिंग करणाऱ्या कंपनीचं नाव सांगितलं नाही, पण शास्त्रज्ञांनी जोकरच्या पोट, कान आणि डोक्याच्या त्वचेचे नमुने घेऊन त्यातून भ्रूण तयार केलं. ते एका सरोगेट कुत्र्यामध्ये प्रत्यारोपित केलं आणि त्यावर लक्ष ठेवलं. 2024 मध्ये, जोकरचा क्लोन तयार झाला, ज्याचं नाव 'लिटल जोकर' ठेवण्यात आलं. महिला सांगते, तो अगदी जोकरसारखाच वागतो.

advertisement

हे ही वाचा : वॉश बेसिनला असलेल्या या छोट्या छिद्राचा उपयोग काय? 99% लोकांना माहितीच नाही

हे ही वाचा : Snake : घरी साप शिरला तर त्याला मारु नका, फक्त हे काम करा, स्वत:च जाईल पळून

मराठी बातम्या/Viral/
कुत्र्याचा झाला मृत्यू, विरह सहन होईना, महिलेने खर्च केले 19 लाख अन् पुन्हा जिवंत केला कुत्रा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल