Snake : घरी साप शिरला तर त्याला मारु नका, फक्त हे काम करा, स्वत:च जाईल पळून
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपण जितके सापाला घाबरतो, तितकेच साप देखील आपल्याला घाबरतात. आपल्यामुळे त्यांना जीवाला धोका आहे असं वाटलं तरच साप आपल्याला चावतात. नाहीतर ते पळ काढतात.
भारतात सापाला देव मानलं जातं. आपल्या देशात सापांची पूजा केली जाते. पण असं असलं तरी लोक सापाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी घाबरतात. बरेच लोक सापांनाही घाबरतात पण येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपण जितके सापाला घाबरतो, तितकेच साप देखील आपल्याला घाबरतात. आपल्यामुळे त्यांना जीवाला धोका आहे असं वाटलं तरच साप आपल्याला चावतात. नाहीतर ते पळ काढतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
याशिवाय, सापांना तीव्र वासाचा त्रास होतो, म्हणून जर घरात साप शिरला तर तिथे फिनाईल, व्हिनेगर किंवा रॉकेल शिंपडा. यासोबत लसूण, लिंबू, दालचिनी आणि पुदिना देखील तुम्ही टाकू शकता, त्याच्या वासाने साप पळून जातात. त्याचप्रमाणे, सापांना तापमानातील बदलांची भीती वाटते. यामुळेच घरात लपलेल्या सापाला धुराच्या मदतीने हाकलून लावले जाऊ शकते.