कुत्रा खिडकीला लटकलेला पाहून इमारतीच्या खाली गर्दी जमू लागली. व्हायरल व्हिडीओमध्ये लोकांच्या ओरडण्याचा आवाजही ऐकू येतो. पण, याच दरम्यान कुत्रा खाली पडताच, त्याच क्षणी सगळं चित्र बदलतं. सुमारे 34 सेकंदांचा हा छोटा व्हिडीओ इंटरनेट वापरकर्त्यांना खूप आवडला आहे. ही घटना ब्राझीलमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
कुत्र्याचा जीव कसा वाचला...?
व्हायरल व्हिडीओमध्ये, कुत्रा इमारतीला लटकलेला असताना तो घाबरलेला दिसतो. कदाचित, त्याला तिथून पडण्याचे परिणामही माहीत असावेत. अशा परिस्थितीत, तो इमारतीची खिडकी घट्ट पकडतो. व्हिडीओमध्ये लोकांच्या गोंधळाचा आवाजही ऐकू येतो. ज्यामध्ये लोकं खूप चिंतेत दिसत आहेत. पण, ज्या खिडकीला कुत्रा लटकलेला आहे, त्याच्या अगदी खाली एक महिला त्याचा जीव वाचवण्यासाठी पुठ्ठा घेऊन उभी असते. कुत्रा खाली पडताच, तो त्या पुठ्ठ्यावर येतो आणि ती महिला त्याला तिच्या घरात घेऊन जाते. यासोबतच, 34 सेकंदांचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ संपतो.
advertisement
महिलेच्या कॅचचं नेटकरी करताहेत कौतुक
हा व्हिडीओ X वर पोस्ट करताना, @crazyclipsonly यांनी लिहिलं- ब्राझीलमधील महिलेने पुठ्ठ्याच्या बॉक्सने पडणाऱ्या कुत्र्याला पकडलं. आतापर्यंत या व्हिडीओला 1 लाख 16 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर पोस्टवर 50 हून अधिक कमेंट्सही आल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये, वापरकर्ते महिलेच्या कॅचचं कौतुक करून थकत नाहीत.
एका वापरकर्त्याने लिहिलं, तो कुत्रा तिथे कसा पोहोचला? दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटलं. काय कॅच आहे. तिसऱ्याने लिहिलं की, त्या कुटुंबाला स्पायडर-मॅन पाहणं थांबवावं लागेल. कुत्र्याला नवीन कल्पना येत आहेत. चौथ्या वापरकर्त्याने म्हटलं, पण तो इमारतीच्या बाहेरच्या बाजूला का चढत होता?
हे ही वाचा : थंडीत गायब झालेले साप आता जागे होणार! उन्हाळा, पावसाळ्यात का असतो सापांचा सुळसुळाट?
हे ही वाच : 1000 कबरींवर आढळले क्यूआर कोड! स्कॅन करताच मृत व्यक्तीचं येत होतं नाव, प्रकार पाहून पोलीस चक्रावले!
