TRENDING:

पृथ्वीवर चमत्कार घडणार! ना आयुष्यात कधी पाहिलं ना पुन्हा कधी पाहायला मिळणार; तारीख लक्षात ठेवा

Last Updated:

Earth News : शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की गेल्या 100 वर्षांत असं कधीच पाहिलं गेलं नाही आणि पुन्हा सहजासहजी पाहता येणार नाही. आपली पिढी पुन्हा कधीही असं दृश्य पाहू शकणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपण जन्मापासून आपल्या आयुष्यात बऱ्याच घटना पाहिल्या आहेत. पण आता अशी घटना घडणार आहे, जी आपण आजवर आयुष्यात कधीच पाहिली नाही आणि पुन्हा ती पाहण्याची संधीही मिळणार नाही. पृथ्वीवर जणू चमत्कारच घडणार आहे. शास्त्रज्ञही या घटनेला ऐतिहासिक मानत आहेत.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

2 ऑगस्ट 2027 हा दिवस जगाच्या खगोलशास्त्राच्या इतिहासात कोरला जाणार आहे. दिवसा उजेडात पृथ्वीचे अनेक भाग अचानक अंधारात बुडातील, तापमानात घट होईल, आकाशात तारे दिसू लागतील आणि काही मिनिटांसाठी पृथ्वीनं धडधडणं थांबवल्यासारखं वाटेल. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की गेल्या 100 वर्षांत असं कधीच पाहिलं गेलं नाही आणि पुन्हा सहजासहजी पाहता येणार नाही.

advertisement

पृथ्वी वाचेल पण माणसांचं काही खरं नाही! फक्त 1 डिग्री तापमान वाढ आणि लाखो लोकांचा मृत्यू

आता हे सगळं का घडणार आहे? तर याचं कारण म्हणजे सूर्यग्रहण. एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण, जे पूर्ण 6 मिनिटं 23 सेकंदांचं असेल, इतका वेळ पृथ्वीवर अंधार असेल. दुपार अचानक रात्रीत बदलले तापमान 5 ते 10 अंशांनी कमी होऊ शकतं, वाऱ्याची दिशा बदलू शकते आणि पक्ष्यांसह अनेक प्राण्यांमध्ये असामान्य वर्तन दिसून येऊ शकतं. पूर्ण सूर्यग्रहणादरम्यान सूर्याचा फिकट कोरोना आणि तेजस्वी ग्रह शुक्र, बुध आणि काही तारे देखील दिसतील. शास्त्रज्ञांच्या मते, दर 18 महिन्यांनी एकदा पूर्ण सूर्यग्रहण होतं, पण इतकं वेळ राहणारं ग्रहण फारच दुर्मिळ आहेत.

advertisement

जगातील कोणते देश अंधारात बुडतील?

हे ग्रहण अटलांटिक महासागरावर सुरू होईल आणि त्याची सर्वात खोल सावली प्रथम जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीजवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडेल. त्यानंतर ते ज्या देशांना स्पर्श करेल त्यात दक्षिण स्पेन, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त आणि नंतर मध्य पूर्वेतील काही भागांचा समावेश आहे. अमेरिका आणि ब्राझीलसारख्या दक्षिण अमेरिकेतील मोठ्या भागात हे दिसणार नाही.

advertisement

अंतराळात सोडलेले सॅटेलाइट दररोज पृथ्वीवरच धडाधड कोसळतायेत, शास्त्रज्ञही घाबरलेत; धरती धोक्यात

भारतातील काही भागात आंशिक सूर्यग्रहण दिसू शकतं, पण ते खूपच मर्यादित आहे. पूर्ण सूर्यग्रहणाचं सर्वात नेत्रदीपक दृश्य पाहण्यासाठी लोकांना स्पेन, मोरोक्को, इजिप्त किंवा मध्य पूर्वेतील काही निवडक शहरांमध्ये जावं लागेल.

2027 नंतर इतकं मोठं सूर्यग्रहण कधी असेल?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

इतक्या दीर्घ कालावधीचं पूर्ण सूर्यग्रहण तेव्हाच घडतं जेव्हा पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर आदर्श प्रमाणात असतं. चंद्र त्याच्या कक्षेत पेरिगी पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदू आहे त्याच्या जवळ असतो. ग्रहणाची सावली पृथ्वीच्या पृष्ठभागावर काटकोनात पडतं. नासाच्या नोंदींनुसार, पुढील असा दीर्घकाळचा अंधार 22व्या शतकात येऊ शकतो. या घटनेचं या पिढीतील सर्वात मोठा खगोलीय देखावा म्हणून स्वागत केलं जात आहे. आपली पिढी पुन्हा कधीही असं दृश्य पाहू शकणार नाही.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
पृथ्वीवर चमत्कार घडणार! ना आयुष्यात कधी पाहिलं ना पुन्हा कधी पाहायला मिळणार; तारीख लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल