एखाद्या वस्तूची किंमत 10 रुपये असेल तर ती आण 5 रुपयात मागतो पण कधी कुणी त्यासाठी 50 रुपये दिल्याचं ऐकलं तरी आहे का? पण असा अनुभव आला एका आंबा विक्रेत्याला. तामिळनाडूतील हा आंबा विक्रेता. त्यानं सांगितलं की, बंगळुरूहून एक ग्राहक त्याच्याकडे आला, त्याने एक किलो आंबे घेतले, ज्याची किंमत 3000 रुपये असल्याचं सांगितलं. पण ग्राहकाने त्याला 17000 रुपये दिले. जवळपास सहापट जास्त पैसे त्याने दिले.
advertisement
Knowledge: आंबा हा फळांचा राजा, मग त्याची राणी कोण माहिती आहे का?
दुकानदारानं सांगितलं, या आंब्याचा हा सर्वाधिक भाव आहे, असं नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत किलोमागे अडीच ते तीन लाखांपर्यंत जाते.
कोणता आहे हा आंबा?
आता इतका महाग आंबा कोणता हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता तुम्हाला असेल, हा आंबा आहे मियाझाकी आंबा. जो मूळतः जपानमधील क्योशु इथं पिकवला जातो. जपानी ग्रेड मियाझाकी आंब्याचं वजन 350 ग्रॅमपेक्षा जास्त असलं पाहिजे तरच तो खरा मियाझाकी आंबा मानला जातो. त्यात साखरेचं प्रमाण किमान 15 टक्के असावं. त्याचा रंग आणि आकार पूर्णपणे योग्य असावा. या आंब्याला जपानी भाषेत 'Taiyo no Tamago' म्हणतात. याचा अर्थ सूर्याची अंडी. त्याच्या चमकदार रंगामुळे असं म्हटलं जाते. अलीकडे सोशल मीडियामुळे हा आंबा खूप चर्चेत आला आहे.
एका नजरेत ओळखा आंबे केमिकलचे की नैसर्गिक! फरक कळायलाच हवा, नाहीतर पडाल आजारी
भारतातही आंब्याचं उत्पादन
हा आंबा आता भारतातही अनेकजण पिकवत आहेत . या आंब्याच्या रोपाची किंमत 950 ते 4000 रुपये आहे. ही रोपं टेरेस गार्डनमध्येदेखील लावता येतात. हा आंबा फक्त चवीलाच चांगला नाही तर त्यात औषधी गुणधर्मही आहेत, असे तो पिकवणाऱ्यांचं म्हणणं आहे. या आंब्याची मूळ वनस्पती जपान आणि थायलंडमध्ये आढळते. तिथून कोलकाता आणि काश्मीरमध्ये आणण्यात आली. यानंतर मियाझाकी आंब्याची रोपं आता भारतभर उपलब्ध आहेत. लागवडीनंतर 8-9 महिन्यांनी ही रोपं फुलू लागतात.