एका नजरेत ओळखा आंबे केमिकलचे की नैसर्गिक! फरक कळायलाच हवा, नाहीतर पडाल आजारी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
केमिकलने पिकवलेले आंबे आरोग्यासाठी घातक असतात, असं डॉक्टर सांगतात. या आंब्यांमुळे पोटदुखी होऊ शकते, जुलाब लागू शकतात, पोट फुगल्यासारखंही वाटू शकतं. केमिकलचे आंबे जास्त खाल्ल्यास शरिरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरताही निर्माण होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक आणि केमिकलयुक्त आंब्यांमधला फरक नेमका कसा ओळखायचा, जाणून घेऊया. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी, हजारीबाग)
आपण वर्षभर आंब्यांची आतुरतेने वाट पाहतो. कच्ची कैरी नुसती खाल्ली किंवा मीठ-मसाला लावून खाल्ली किंवा कालवणात घालून खाल्ली तरी भारीच लागते. परंतु पिकलेल्या आंब्यांना काही तोडच नसते. म्हणूनच तर आंब्याला फळांचा राजा म्हणतात. परंतु आजकाल बाजारात असे केमिकलयुक्त आंबे मिळतात की त्यांच्यात आणि नैसर्गिक आंब्यांमध्ये काही फरकच वाटत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement