संगारेड्डी जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना. 25 वर्षांची ही महिला जिला मुंग्यांची भीती वाटत होती. घराची साफसफाई करताना तिला मुंग्या दिसल्या आणि ती इतकी घाबरली की मुंग्यांना घाबरून तिने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. घरात साडीसह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आहे. 4 नोव्हेंबर रोजीची ही घटना.
मुलगी रात्री ओरडायची, रूममधून विचित्र आवाज; वडिलांना सापडलं असं काही, VIDEO पाहणारेही हादरले
advertisement
पोलिसांनी सांगितलं की, सकाळी कामावर गेलेला तिचा पती संध्याकाळी परत आला तेव्हा त्याला मुख्य दरवाजा आतून बंद आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला आणि त्याची पत्नी फासावर लटकलेली आढळली. घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली. जी या महिलेने मृत्यूपूर्वी लिहिली. चिठ्ठीत लिहिलं होतं, "मला माफ करा मी या मुंग्यांसोबत राहू शकत नाही. माझ्या मुलीची काळजी घ्या."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सांगण्यात आलं की, या महिलेला लहानपणापासूनच मुंग्यांची भीती वाटत होती आणि यापूर्वी तिने तिच्या मूळ गावी मंचेरियाल येथील रुग्णालयात समुपदेशन घेतलं होतं. घटनेच्या दिवशी महिलेने तिच्या मुलीला एका नातेवाईकाच्या घरी सोडलं होतं आणि घर स्वच्छ केल्यानंतर ती तिला घेऊन जाईल असं सांगितलं होतं.
Breast Size : लग्नानंतर ब्रेस्टचा आकार का वाढतो; लग्न आणि स्तन या दोघांचा संबंध काय?
पोलिसांनी म्हणाले, "असं दिसतं की तिला साफसफाई करताना मुंग्या दिसल्या असतील आणि भीतीपोटी तिने हे पाऊल उचललं असावं." अमीनपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
मुंग्यांची भीती कशी काय वाटू शकते?
असं तुम्हाला वाटेल. कारण मुंग्या बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसतील. तशा त्या फक्त चावतात, त्यांच्यापासून काही आपल्याला धोका नाही. हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मुंग्यांना कुणी घाबरेल, हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण खरंतर हा एक प्रकारचा आजारच आहे. मायर्मेकोफोबिया (Myrmecophobia). म्हणजे मुंग्यांची भीती. ज्यांना मायर्मेकोफोबिया असतो, त्यांना मुंग्या पाहिल्या किंवा त्यांचा विचार जरी केला तरी घबराट, बेचैनी किंवा अस्वस्थता जाणवते. कधी कधी ही भीती इतकी तीव्र असते की त्या व्यक्तीला मुंग्या असू शकतील अशा जागाही टाळायच्या वाटतात.
