TRENDING:

Viral Video : एका Reel साठी तरुणीचा जीवघेणा स्टंट, चालत्या ट्रेनच्या दरवाज्यात उभी राहिली आणि...

Last Updated:

नक्की काय होतं त्या व्हिडिओमध्ये? एका तरुणीनं सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी मुर्खपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो एका रात्रीत चर्चेचा विषय ठरला. लोक आश्चर्यचकित झाले, काहींनी राग व्यक्त केला, तर काहींनी उगाच गंमत म्हणून पाहिला. पण नक्की काय होतं त्या व्हिडिओमध्ये? एका तरुणीनं सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी मुर्खपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या.
स्टंट व्हिडीओ
स्टंट व्हिडीओ
advertisement

एका वेगवान ट्रेनच्या दरवाज्यावर उभी राहिली आणि मागच्या बाजूला वाकून व्हिडीओ बनवू लागली. तिचा एक हात तिने व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीच्या हातात दिला आणि दुसरा हात सोडून आपले केस आणि संपूर्ण अंग मागच्या बाजूला झुकवून तिने हा स्टंट केला.

हा स्टंट पाहून काहींनी कौतुक केलं, पण अनेकांनी संताप व्यक्त केला.

"हीरोइन बनायचं वेड डोक्यात गेलंय का?" असं एका युजरने संतापून कमेंट केली. तर दुसऱ्याने लिहिलं, "तुला काही झालं तर याचा दोष कोणाला द्यायचा?"

advertisement

हा धक्कादायक व्हिडिओ @saiba__19 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. तरुणीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "तुम्ही माझी इतकी काळजी करता! सॉरी, आता पुढे असं काही करणार नाही." तिच्या या पोस्टवरही लोकांनी तिला झापलं.

advertisement

View this post on Instagram

A post shared by ♥️

मराठी बातम्या/Viral/
Viral Video : एका Reel साठी तरुणीचा जीवघेणा स्टंट, चालत्या ट्रेनच्या दरवाज्यात उभी राहिली आणि...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल